भरधाव ऑटो पलटी, 3 प्रवासी जखमी

करणवाडी येथील तिघे जखमी

जितेंद्र कोठारी, वणी: प्रवासी घेऊन मारेगावकडे येणारा भरधाव ऑटो रस्त्यात पलटी झाला. या अपघातात ऑटोमधील 3 प्रवासी जखमी झाले. आज दुपारी 2.30 वाजता सुमारास मारेगाव शहराजवळ ही घटना घडली.

Podar School 2025

मारेगाव शहरात मंगळवारी आठवडी बाजार भरतो. बाजारासाठी येणारे प्रवासी घेऊन ऑटो करणवाडी मार्गे मारेगावला येत होता. दरम्यान मारेगाव शहराच्या हद्दीत ऑटोवरुन चालकाचा ताबा सुटून भरधाव ऑटो रस्त्यावर पलटी झाला.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

या दुर्घटनेत अनिता बुसरू आत्राम (35) रा. म्हैसदोडका, मनोज सुभाष अंड्रस्कर (37) रा. गोंडबुरांडा व नत्थु विठू कोवळे रा. करणवाडी असे 3 प्रवासी जखमी झाले. जखमीवर मारेगाव ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी रेफर करण्यात आले आहे.

हे देखील वाचा:

Comments are closed.