दोन दुचाकीची समोरासमोर धडक, कळमना येथील तरुणाचा मृत्यू

माथा फाटा जवळील घटना, अपघात दोघे गंभीर जखमी

जितेंद्र कोठारी, वणी: तालुक्यातील कळमना येथील एका तरुणाच्या दुचाकीची दुस-या दुचाकीशी समोरासमोर धडक झाली. यात कळमना येथील तरुणाचा मृत्यू झाला. पुरुषोत्तम उर्फ प्रफुल्ल घनशाम मुसळे (34) असे मृत तरुणाचे नाव आहे. सदर अपघात हा कोरपना जवळील माथा फाटा येथे दुपारी 4 वाजताच्या सुमारास झाला.

Podar School 2025

मंगळवार दिनांक 10 रोजी प्रफुल्ल हा आपल्या सुपर स्प्लेंडर (MH29Q 6254) ने कामानिमित्त कोरपना कडे जात होता. तर हिरो पल्सर (MH34 DY 5204) ही दुचाकी गडचांदूरकडे जात होती. दुपारी 4 वाजताच्या सुमारास कोरपना जवळील माथा फाटा जवळ दोन्ही दुचाकीची समोरासमोर जबर धडक झाली. या अपघातात प्रफुल्लच्या डोक्याला मार लागला व रक्तस्राव होऊन प्रफुल्लचा जागीच मृत्यू झाला.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

अपघातात दुसऱ्या दुचाकीवरील सोहेल शेख (18) व उमेश पेंदोर (18) रा. हातलोणी हे देखील गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच कोरपना पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जखमींना ग्रामीण रुग्णालय कोरपना येथे दाखल केले. मात्र जखमींची अवस्था गंभीर असल्याने त्यांना चंद्रपूर येथे रेफर करण्यात आले आहे. घटनेचा पुढील तपास कोरपना पोलीस करित आहे.

 

हे देखील वाचा: 

Comments are closed.