सोमनाळा, गौराळा फाट्याजवळ एका पाठोपाठ एक अपघात

एक गंभीर तर दोघे जखमी... मंगळवारची रात्र ठरली अपघाताची...

विवेक तोटेवार, वणी: सोमनाळा, गौराळाजवळ एकापाठोपाठ एक अपघात झाले. यात एक गंभीर जखमी झाला तर दोघे जण जखमी झालेत. मंगळवारी रात्री पावने आठ वाजताच्या सुमारास अवघ्या 10 मिनिटांच्या कालावधीत हे दोन्ही अपघात झालेत. गौराळा फाट्याजवळ एका कार व दुचाकीची समोरासमोर धडक झाली. यात दुचाकीचालकाचा पाय मोडला. जखमीला मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. तर दुसरी घटना ही सोमनाळा फाट्याजवळ झाली. सोमनाळा येथील जुम्मन शेख नामक एक तरुण मारेगावहून गावी परतताना त्याच्या व वणी हून मारेगावच्या दिशेने जाणा-या दुचाकीची समोरासमोर धडक झाली. यात दोन्ही दुचाकीचालक जखमी झालेत. दोन्ही दुचाकीचालकांना वणीतील खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. सोमनाळा, निंबाळा फाट्यावर सातत्याने होणारे अपघात चिंतेचा विषय बनला आहे. या रस्त्यावर असणारी ट्रॅफिक व रस्त्यावरील खड्डे हे अपघातास कारणीभूत असल्याचा आरोप परिसरातील लोक करीत आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.