निकेश जिलठे, वणी: एका भरधाव ट्रकने दुचाकीला मागून जबर धडक दिली. यात पती पत्नी व मुलगी जखमी झाले. शनिवारी रात्री 8.30 वाजताच्या सुमारास वरोरा रोड वरील गुंजच्या मारोतीजवळ हा अपघात झाला. या प्रकरणी ट्रक चालकाला अटक करण्यात आली असून चालकावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्राप्त माहिती नुसार, राजिक गफूर शेख (34), रुबिना राजिक शेख (30) व नाज राजिक शेख (10) सर्व रा. चुनावॉर्ड वरोरा येथील रहिवासी आहे. ते शनिवारी वणी येथील गोकुळनगर येथे एका कार्यक्रमासाठी दुचाकीने सहकुटुंब आले होते. रात्री कार्यक्रम आटपून ते वरोरा येथे परतत होते. दरम्यान रात्री 8.30 वाजताच्या सुमारास वरोरा येथे परतत होते. दरम्यान वणी-वरोरा मार्गावरील एका चिकन सेंटरजवळ त्यांच्या दुचाकीला मागून भरधाव येणाऱ्या ट्रकने (सी.जी.०८-ए.डब्ल्यू. ४४३५) जोरदार धडक दिली.
या अपघातात आई व मुलगी ट्रकच्या समोरील दोन चाकांच्या मधात अडकल्याने आईचा पाय, तर मुलीचा हात ट्रकच्या चाकाखाली चिरडला गेला. तर दुचाकीचालक हा उसळून रोडच्या विरुद्ध बाजूने पडल्याने तोही गंभीर जखमी झाला. पोलिसांनी अपघातास कारणीभूत ठरलेला ट्रक ताब्यात घेतला असून ट्रक चालकालाही अटक केली आहे.
ट्रकचालकावर बीएन- एसच्या कलम २८१, १२५ (बी) सहकलम १३४ मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास जमादार गजानन होडगीर व पोलिस शिपाई पुरुषोत्तम डडमल हे करीत आहेत.
Comments are closed.