कार व दुचाकीची समोरासमोर धडक, दुचाकीचालक जागीच ठार

गावी परतत असताना नांदेपेरा रोडवर झाला अपघात

विवेक तोटेवार, वणी: कार व दुचाकीची समोरासमोर जबर धडक झाली. या भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा दुर्दैवी मृत्यू झाला. सोमवारी रात्री 11.30 वाजताच्या सुमारास वणी-नांदेपेरा मार्गावरील प्रसाद हॉटेलजवळ हा अपघात झाला. आनंद विजय नक्षिणे (26, रा. वांजरी) असे मृत युवकाचे नाव आहे. तो वांजरी येथील रहिवासी होता. आनंद हा शहरातील देशमुखवाडी येथे राहणाऱ्या त्याच्या आत्याकडे आला होता. रात्री 11 वाजताच्या सुमारास तो वांजरी येथे गावी परत जात होता. दरम्यान नांदेपेरा चौफुली वळण रस्त्यावर कार व दुचाकीची समोरासमोर जोरदार धडक झाली.

दुचाकी कारला धडकल्याने आनंद रोडवर पडला. यात त्याच्या डोक्याला जबर मार लागला. अपघातस्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी त्याला तत्काळ ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. घटनेची पोलिसांनी नोंद केली आहे. आनंद याचे वडील विजय यांच्या तक्रारीवरून वाहन चालकाविरुद्ध बीएनएसच्या कलम 281, 106 (1) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

(रेग्लुलर बातमी व अपडेटसाठी खालील लिंकवर क्लिक करून वणी बहुगुणीचा फेसबूक गृप जॉइन करा.. )
https://www.facebook.com/groups/241871233000964

Comments are closed.