आजी-आजोबा व नातीवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार

घोन्सा येथील एकाच कुटुंबातील तिघांवर काळाचा घाला

बहुगुणी डेस्क, वणी: नातेवाईकाकडे नवीन वर्षांच्या स्वागतासाठी गेलेल्या घोन्सा येथील एकाच कुटुंबातील तिघांचा अपघाती मृत्यू झाला. तर एक मुलगी जखमी झाली आहे. दुचाकीने गावी परत येताना दुचाकीला एका ट्रकने जबर धडक दिली. मंगळवारी दिनांक 31 डिसेंबर रोजी रात्री 9.30 वाजताच्या सुमारास भद्रावती जवळ ही घटना घडली. सतिश भाऊराव नागपुरे (51), मंजुषा सतिश नागपुरे (47) व मायरा राहुल नागपुरे (2) सर्व रा. घोन्सा असे मृत झालेल्या व्यक्तींची नावे आहेत. तर स्माईली विजय कामतवार (7) रा. भद्रावती असे किरकोळ जखमी मुलीचे नाव आहे.

Podar School 2025

भद्रावतीतील चिरादेवी येथे नववर्षानिमित्त भव्य यात्रा भरते. भद्रावती येथे मृत सतिश नागपुरे यांचे नातेवाईक राहतात. यात्रेनिमित्त ते घोन्शावरून पत्नी व नात यांच्यासह त्यांची टीव्हीएस स्पोर्ट दुचाकीने (MH29AZ9949) भद्रावती येथे आले होते. नागपूर-चंद्रपूर हायवेवर त्यांच्या नातेवाईकाचा सेवन डे नामक धाबा आहे. संध्याकाळी 8 वाजताच्या सुमारास ते त्यांची पत्नी, नात व भद्रावती येथील स्माईली कामतवार ही 7 वर्षीय मुलगी धाब्यावर जेवायला गेले.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

जेवन आटोपल्यानंतर रात्री साडे नऊ वाजताच्या सुमारास ते भद्रावती येथे नातेवाईकाकडे परतत होते. दरम्यान भद्रावतीकडे जाणारा रस्ता ओलांडताना त्यांच्या दुचाकीला नागपूरहून चंद्रपूर मार्गे जाणा-या भरधाव ट्रकने (MH40AK 2095) समोरून धडक दिली. या धडकेत ट्रकने पत्नी पत्नीला चिरडले गेले. यात त्या दोघांचा जागीच मृत्यू झाला तर नात मायरा ही गंभीर जखमी झाली. तिला तातडीने उपचारासाठी नागपूर येथे नेत असताना तिचा वाटेतच मृत्यू झाला. या अपघातात स्माईली ही किरकोळ जखमी झाली.

नववर्षालाच मिळाली दुर्दैवी बातमी
एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्याची बातमी सकाळ पर्यंत घोन्सा येथे पोहोचली. घटनेची माहिती मिळताच गावत शोककळा पसरली. तिघांवरही गावालगत असलेल्या विदर्भा नदीच्या पात्राजवळील स्मशान भूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी गावक-यांनी सोककुल वातावरणात त्यांना अखेरचा निरोप दिला. या प्रकरणी ट्रकचालक लोकेश नंदू चव्हाण रा. पुसद याला अटक केली आहे. घटनेचा तपास भद्रावती पोलीस करीत आहे.

Comments are closed.