पोलिसांच्या हातावर तुरी देऊन आरोपी पसार

0

विवेक तोटेवार, वणी: शिरपूर पोलिसांच्या ताब्यात असलेला एक आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झाला. मंगळवारी संध्याकाळी 7 वाजताच्या सुमारास करंजीजवळ ही घटना घडली. ताब्यात असलेला आरोपी फरार झाल्याने शिरपूर पोलिसांची सध्या झोप उडाली आहे.

Podar School 2025

आरोपी अभय पचारे (19) याच्यावर बॅटरी चोरीचे गुन्हे दाखल आहे. त्याला मंगळवारी शिरपूर पोलिसांनी न्यायालयात हजर केले होते. त्यानंतर त्याची रवानगी यवतमाळ येथील जेलमध्ये करण्यात येणार होती. सूत्राने दिलेल्याय माहितीनुसार एका खासगी वाहनाने दोन पोलीस कर्मचा-यासह त्याला यवतमाळला नेले जात होते. करंजीमध्ये एक कर्मचारी एटीएमध्ये पैसे काढण्यास उतरले. तर दुसरे कर्मचारी आरोपी सोबत होते. मात्र आरोपीने हातातील बेड्या काढून पळ काढला.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

आरोपी पळून जातात पोलीस विभागात खळबळ उडाली. आरोपीचा शोध घेण्यासाठी रात्रभर शिरपूर पोलीस भटकत होते. मात्र अद्यापही त्याचा पत्ता लागलेला नाही. आरोपीला नेहमी एसटीसारख्या खासगी वाहनाने नेले जाते. मात्र या प्रकरणात त्याला खासगी वाहनाने का नेले जात होते असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.