दुष्कर्माच्या गुन्ह्यातील आरोपी पोलीस ठाण्यातून पसार

पाणी पिण्याच्या बहाणा करुन काढला पळ

जितेंद्र कोठारी, वणी : एका विवाहित महिलेवर दुष्कर्माच्या गुन्ह्यातील आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पोलीस ठाण्यातुन पसार झाल्याची घटना बुधवारी दुपारी 12.30 वाजता सुमारास उघडकीस आली. या घटनेमुळे वणी पोलीस ठाण्यात खळबळ उडाली आहे. आरोपी विरुद्द कलम 224 अनव्ये गुन्हा दाखल करुन पोलीस आरोपीचा शोध घेत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार वणी येथील फुकटवाडी भागात राहणाऱ्या सौरभ उर्फ मिंटू बोरूले (25) विरुद्द एका विवाहित महिलेने वारंवार दुष्कर्म  केल्याची तक्रार 20 एप्रिल रोजी वणी पोलीस ठाण्यात दाखल केली होती. तक्रारीवरून आरोपीविरुद्ध कलम 376 अनव्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्यात तपास अधिकारी सपोनि माया चाटसे यांनी गुरुवार 28 एप्रिल रोजी आरोपीला ठाण्यात बोलाविले. 
पोलीस स्टेशनच्या चार्जरुम मध्ये आरोपीला बसवून अटक करण्याची प्रक्रिया पार पाडत असताना संधी साधून आरोपीने मागील दारातून पळ काढले. आरोपी ठाण्यातून पसार झाल्याचे लक्षात येताच पोलिसांमध्ये खळबळ उडाली. पोलीस स्टेशनमधून दुष्कर्माच्या गुन्ह्यातील आरोपी फरार झाल्याबाबत सोशल मीडियावर गुरुवारी सकाळपासून एक पोस्ट व्हायरल झाली. त्यामुळे शहरात विविध चर्चेला उधाण आले. आरोपी अद्याप फरार असून वणी पोलीस शोध घेत आहे.

 

पोलिसांची बदनामी करण्याचा कट ?
दुष्कर्माच्या गुन्ह्यातील आरोपी मिंटू बोरुले हा गुरुवारी दुपारी स्वतःहून पोलीस ठाण्यात आला होता. तपास अधिकारी सपोनि माया चाटसे यांनी आरोपीला चार्जरूम मध्ये बसविले. मात्र काही वेळाने पाणी पिण्याच्या बहाणा करून आरोपी मागच्या दाराने पळ काढला. आरोपीला अटक करण्यात आले नव्हते तसेच त्याचा मेडिकलही करण्यात आलेला नाही. पोलिसांना बदनाम करण्याचा उद्देशाने खोटी पोस्ट व्हायरल करण्यात आली आहे.
रामकृष्ण महल्ले- पोलीस निरीक्षक, पो.स्टे. वणी

Comments are closed.