शेतजमिनीच्या मोबदल्यावरुन आजी-माजी आमदारांमध्ये खडाजंगी

हटवांजरी येथील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचा फाशी घेण्याचा प्रयत्न

भास्कर राऊत, मारेगाव: तालुक्यातील हटवांजरी येथील धरणासाठी अधिग्रहीत केलेल्या शेतकऱ्यांच्या जमिनीच्या मुद्यावरून आता राजकारण पेटायला सुरूवात झाली आहे. या मुद्यावरून माजी आमदार व विद्यमान आमदार यांच्यात आज चांगलीच जुंपली. हे प्रकरण हातघाईवर जाण्याची चिन्ह दिसताच उपस्थित पोलिसांनी दोन्ही नेत्यांना धरून रोखले. सध्या हटवांजरी येथील काही शेतकरी मोबदल्यावरून आंदोलन करण्यास बसले आहे. शुक्रवारी रात्री काही आंदोलक शेतक-यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यामुळे आज आंदोलकांना भेटण्यासाठी माजी आमदार विश्वास नांदेकर व विद्यमान आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार हे एकाच वेळी पोहोचले. दरम्यान शेतकऱ्यांशी चर्चा करताना दोन नेत्यांमध्ये चांगलीच शाब्दिक खडाजंगी झाली.

हटवांजरी – सराटी या शिवारात शासनाने सन 2009 -10 मध्ये धरण बांधण्याचा निर्णय घेतला. यासाठी  11 शेतकऱ्यांची 30.62 हे.आर जमीन संपादित केली गेली. जमिनीचा मोबदला म्हणून शासनाने 1 लाख 42 हजार 500 रुपये प्रती हेक्टर दर ठरविली. परंतु शासनाकडून मिळणारी ही रक्कम फारच तोकडी असल्याने हा मोबदला प्रकल्पग्रस्त शेतकाऱ्यांनी अमान्य असल्याचे लेखी लिहून दिले. पुढे हे प्रकरण कोर्टात गेले. तेव्हापासून प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचा संघर्ष सुरू आहे.

शुक्रवारी दिनांक 29 रोजी धरणाच्या कामासाठी मशीनीने खोदकाम सुरूवात झाल्याची माहिती प्रकल्पग्रस्त शेतकऱ्याना मिळाली. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतक-यांनी त्या ठिकाणी आंदोलन सुरु केले. शुक्रवारी रात्री दरम्यान काही शेतकऱ्यांनी फाशी घेण्याचा प्रयत्न केला. मात्र मारेगाव पोलिसांना माहिती मिळाल्यामुळे पोलिस तत्काल पोहचले व पुढील अनर्थ टळला. हटवांजरी येथील शेतकऱ्यांकडून आत्महत्याचा प्रयत्न व आंदोलन करीत असल्याची माहिती मिळताच आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार शनिवार 30 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता दरम्यान हटवांजरी येथे  पोहचले. तत्पूर्वी माजी आमदार विश्वास नांदेकरसुद्दा आंदोलन स्थळी पोहचले होते.

माजी आमदार नांदेकर यांनी आमदार बोदकुरवाऱ् यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष द्या असे म्हटल्यावर तुमचे सरकार आहे तुम्ही पहा असे खोचक उत्तर आमदार बोदकुरवार यांनी दिले. यावर तुमचे सुद्धा सरकार आधी होते तेव्हा काय नाही हा प्रश्न सोडविला, असे नांदेकर यांनी म्हणताच दोन्ही आजीमाजी आमदारांमध्ये शाब्दिक खडाजंगी झाली. तसेच विषय हातघाई पर्यन्त पोहचला. मात्र पोलिसांच्या सतर्कतेने पुढील अनर्थ टळल्याचे प्रत्यक्षदर्शी शेतकरी यांनी सांगितले. सदर प्रकरण पुढे काय वळण घेते याकडे नागरिकांचे लक्ष लागून आहे.

पहा आजीमाजी आमदारांच्या खडाजंगीचा व्हिडिओ :

 

Comments are closed.