घरात घुसून मारहाण केल्या प्रकरणी आरोपीस दोन वर्षांचा कारावास

हिवरी येथील प्रकरण, मारेगाव न्यायालयाचा निकाल

भास्कर राऊत, मारेगाव: तालुक्यातील हिवरी येथे दिनांक 16 मे 2017 रोजी एका महिलेला घरात घुसून मारहाण केल्या प्रकरणी आरोपी अनिल लेतू मेश्राम याला मारेगाव न्यायालयाने दोन वर्षांच्या सश्रम कारावासाची व दोन हजारांच्या दंडाची शिक्षा तसेच दंड न भरल्यास दोन महिन्याचा अधिकच्या कारावाची शिक्षा सुनावली आहे. प्रथम श्रेणी न्यायाधीश एन. पी. वासाडे यांनी ही शिक्षा ठोठावली आहे.

सविस्तर प्रकरण असे की, मारेगाव तालुक्यातील हिवरी येथे फीर्यादी दिनांक 16 मे 2017 रोजी सकाळी 10 वाजता गावाबाहेर प्रातःविधी साठी गेली होती. दरम्यान आरोपीने तिथे का बसली असे म्हणत महिलेस हटकले. फिर्यादी ही तिच्या घरी परत येत असताना आरोपी हा तिच्या मागे लोखंडी सळाख घेऊन आला व घरात घुसून लोखंडी सळाखीने महिलेच्या डोक्यावर प्रहार करून तिला जखमी केले.

सदर घटनेची फिर्याद पोलीस स्टेशन मारेगाव येथे त्याच दिवशी करण्यात आली. फिर्यादीच्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन मारेगाव येथे गुन्ह्याची नोंद करून आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानुसार सदर गुन्ह्याचा तपास पूर्ण करून प्रकरण न्यायदंडाधिकारी मारेगाव यांच्या न्यायालयात न्यायप्रविष्ठ केले.

सदर प्रकरणात सरकारी पक्षाच्या वतीने विशेष सहायक सरकारी अभियोक्ता चैताली एस. खांडरे यांनी फिर्यादी व इतर साक्षीदार यांचे पुरावे नोंदविले. अंतिम युक्तिवादानंतर फिर्यादीचा व इतर साक्षीदारांचा पुरावा ग्राह्य धरून सदर प्रकरणातील आरोपीस शिक्षा ठोठावण्यात आली. सदर प्रकरणात न्यायालय पैरवी म्हणून सहाय्यक फौजदार ज्ञानेश्वर ढूमने यांनी सहकार्य केले.

हे देखील वाचा:

रात्र होताच घरावर होते दगडफेक, लिंबू फेकून मारल्याने खळबळ

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.