महाराष्ट्र बँक चौकातील टाईम्स फोटो स्टुडिओ सील

नियम भंग करणाऱ्या फोटो स्टुडिओ विरुद्ध कार्यवाही

0

जितेंद्र कोठारी, वणी: लॉकडाउन आणि संचारबंदी आदेशाचे उल्लंघन करून आस्थापना सुरु ठेवण्याच्या तक्रारीवरून प्रशासनिक पथकाने फोटो स्टुडिओ विरुद्ध कार्यवाही करीत दुकानाला सील ठोकले. आज शनिवार 15 मे रोजी ही कार्यवाही करण्यात आली. एका आठवड्यात दुकाने सील करण्याची ही तिसरी कारवाई आहे.

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर राज्यात 1 जून 2021 पर्यंत कडक निर्बंध लागू करण्यात आले आहे. अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व आस्थापना बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी यवतमाळ यांनी निर्गमित केले आहे. मात्र बंदी घालण्यात आलेली अनेक दुकानातून लपून छपून व्यवहार सुरु असल्याचे निदर्शनास आले आहे.

अशातच प्रशासनिक पथकाने माहेर वस्त्रालय, राधिका साडी सेंटर व आता टाइम्स फोटो स्टुडिओ विरुद्ध कार्यवाही करुन दुकानाला सील ठोकले आहे. सदर कारवाई मुख्याधिकारी महेश रामगुंडे, पोलीस उप निरीक्षक गोपाल जाधव व पथकाने पार पाडली.

हे देखील वाचा:

नितीन गडकरींतर्फे 4 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर भेट

वरझडी येथील शंकर चहारे यांचे निधन

Leave A Reply

Your email address will not be published.