आदर्श विद्यालयात विध्यार्थी कल्याण मंडळाची निवडणूक

मतदान प्रक्रियेतून निवडले प्रतिनिधी

0

विलास ताजने (मेंढोली)- वणी येथील आदर्श विध्यालयात चालू शैक्षणिक सत्राकरीता विध्यार्थी कल्याण मंडळाची निवडणूक लोकशाही पद्धतीने घेण्यात आली. शनिवारला मतदान प्रकिया पार पडली. (दि.३०) तर सोमवारला मतमोजणी करून निकाल जाहीर करण्यात आला.

निवडणुकीत शाळानायक म्हणून वर्ग १० वा (क) चा अंकित मांडवकर, शाळानायिका १० वा (ब) ची लक्ष्मी पारखी, क्रीडानायक म्हणून ८ वा (अ) चा सुरज गाताडे, क्रीडानायिका १० वा (ब) ची सुनीता मंगाम, आरोग्य नायक म्हणून १० वा (ड) चा संदीप गुप्ता, आरोग्य नायिका १० वा (अ) ची तृप्ती माळीकर तर सांस्कृतिक प्रतिनिधी म्हणून १० वा (अ) चा नयन आसुटकर आणि १० वा (ब) ची अश्विनी अडकीने यांची निवड झाली. वैजनाथ खडसे यांनी निकाल जाहीर केला. मुख्याध्यापक सुरेश घोडमारे यांनी विजयी उमेदवारांचे स्वागत केले.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

मतदान अधिकारी म्हणून विजय वासेकर, बाबाराव कुचनकर, रवींद्र उलमाले, यशवंत भोयर, यांनी काम पाहिले. निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी विकास बलकी, गजानन टेंमुर्डे, रमेश ढुमने, विलास ताजने, सुनिल बलकी, रुपलाल राठोड, शंकर राठोड, अजय बदखल, ज्ञानेश्वर दातारकर, लता पाटणकर, संध्या लोणारे, पूनम सिंग यांनी सहकार्य केले.

Leave A Reply

Your email address will not be published.