अडेगाव येथे रक्तदान शिबिर
राजू कांबळे, मुकुटबन: अडेगाव येथे रक्तदान महादान फोउंडेशन व भोलेनाथ महाशिवरात्री महोत्सव समिती, अडेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने अडेगाव येथे भव्य रक्तदान शिबिर घेण्यात आले. 15 मार्चला या शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. या शिबिराला सुमारे 200 रक्तदात्यांनी रक्तदान केले. या शिबिराला यवतमाळ आणि नागपूर इथल्या ब्लड बँकेचे सहकार्य लाभले.
अडेगावात सकाळी महाशिवरात्री निमित्य महाराजांची पालखी काढण्यात आली. त्यानंतर सकाळी 11 वाजता रक्तदान शिबिराला सुरवात झाली. रक्तदान शिबिरामध्ये अडेगावच्या प्रथम नागरीक ममता पंडित माहुरे यांनी रक्तदान केले. तसंच गावामधील 15 महिलांनी देखील रक्तदान केले. देवसभरात सुमारे 200 रक्तदात्यांनी रक्तदान केले.
देवस्थानामध्ये काळे महाराजांचे कीर्तन आयोजन करण्यात आले होते. महाशिवरात्री महोत्सव समिती तर्फे जेवणाचा कार्यक्रम आयोजित केलेला होता. या कार्यक्रमाला रक्तदान महादान फोउंडेशनचे अध्यक्ष मंगेश पाचभाई, गणेश पेटकर, प्रफुल्ल भोयर, पोलीस पाटील अशोक उरकुडे, दिगंबर पाचभाई, आकाश गोचे, गणेश पारखी, चंद्रकांत पानघाटे, अरुण येवले, पुरुषोत्तम हिवरकर, धनंजय पाचभाई, नरेंद्र कोठारी, सतीश पाचभाई, शरद काळे, खुशाल पारखी, शैलेश करिये, कृष्णा खोबरे, भूषण काटकर, बापू आसुटकर, सूर्यकांत दातरकर, बंडू घाटे, विकास निखाडे, अजय काटकर, पोचिराम काटकर, देवानंद काटकर यांनी परिश्रम घेतले.