अडेगाव येथील ईशान मिनरल्स डोलोमाईट कंपनी तर्फे मोफत आरोग्य शिबिर
सुशील ओझा, झरी: तालुक्यातील अडेगाव येथे पाहिजे त्या आरोग्य सुविधा नाहीत. ज्यामुळे सामान्य गोरगरीब रुग्णांना वणी, चंद्रपूर, पांढरकवडा नागपूर, किंवा यवतमाळ येथे जावे लागते. ह्या बाबींची जाणीव ठेऊन ईशान मिनरल्स प्रा. ली. डोलोमाईट अँड लाईमस्टोन अडेगावचे संचालक राजकुमार अग्रवाल ( संचालक ईशान मिनरल्स प्रा. ली. ), संगीता अग्रवाल, डॉ. अवीशा अग्रवाल ( एम डी ), यांच्या कडून मोफत महाआरोग्य शिबिर व योगाचे शिबिर आयोजित करण्यात आले. शिबिरात वेगवेगळे अनेक तपासण्या करण्यात आल्या.
शिबिराचे उद्घघाटन पंचायत समिती सभापती लता आत्राम, सरपंच अरुण हिवरकर, पोलीस पाटील अशोक उरकुडे, डॉ. अविशा अग्रवाल, डॉ.ललित लांजेवार, डॉ. अक्षय तुगनायत तिन्ही (दंत रोग तज्ञ) , डॉ.निशा सूर (स्त्री रोग तज्ञ) ,संचिता नगराळे (स्पेशालिस्ट), डॉ. शोभा खुराणा, डॉ. महेश सूर, डॉ. उजमा शाह, डॉ. सपना वैद्य, डॉ. विधाते, डॉ. विवेक गोफणे, डॉ. यास्मिन सलाट जनरल फिजिशियन, पूजा गढवाल ( अध्यक्ष इनर व्हील ऑफ क्लब वणी ), ठाकरे, अंशुला चिंडालीया, कमलेश ह्या सर्वांचे गुलाबाचे पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. त्यानंतर स्त्रीरोग, हृदयरोग, दंतरोग, बालरोग, त्वचारोग, मधुमेह रोग तज्ज्ञांनी रुग्णांची तपासणी केली. या शिबिरात आदर्श हायस्कूल, जिल्हा परिषद शाळेतील ५०२ विद्यार्थी व अडेगावातील ३४८ गरजू रुग्णांना तपासून औषध, गोळ्यांचे वाटप करण्यात आले.
शोभा भागीया, नागपूर ( पतंजली महाराष्ट्र राज्य प्रभारी ) यांनी आदर्श हायस्कूल, जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी व अडेगावातील युवा व वयोवृद्ध महिला, पुरुषांना व्यायाम, योगासने करून शरीर कसे निरोगी ठेवता येते, ह्यासंबंधी मार्गदर्शन करून योगाची प्रात्यक्षिके करून दाखविली. महाआरोग्य शिबिर यशस्वी करण्यासाठी ईशान मिनरल्सचे व्यवस्थापक देवेंद्र रंगारी, सहाय्यक व्यवस्थापक मनोज सिंग, इस्माइल कनोजे, सुनील भावसार, कवडू आसुटकार, दुष्यंत काटकर, झिंगुजी गोहणे, प्रमोद सुपासे, ज्ञानेश्वर चटप, विश्वास कोकमवार, रवींद्र ठाकरे, विनीत मासिरकर, महेश मडावी, श्रीकांत अवताडे, मोरेश्वर मलवडे, प्रफुल झाडे, प्रवीण बिंद व ईतरानी अथक परिश्रम घेतले.