अखेर अडेगाव ग्रामपंचायतीला मिळाला ग्राम विकास अधिकारी
सामाजिक कार्यकर्ते मंगेश पाचभाई यांनी दिला होता उपोषणाचा इशारा
सुशील ओझा, झरी: तालुक्यातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे गाव म्हणून ओळख असलेल्या अडेगाव ग्रामपंचायतीमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून ग्रामपंचायतीमध्ये ग्राम विकास अधिकारी हे पद असताना देखील तिथे सचिव कार्यरत होते. मात्र अखेर सचिव प्रांजली वाढई यांची बदली बोपापूर येथे करण्यात आली व ग्रामविकास अधिकारी व्ही गव्हारकर यांची नियुक्ती अडेगाव येथे करण्यात आली. याबाबत सामाजिक कार्यकर्ते मंगेश पाचभाई यांनी उपोषणाचा इशारा दिला होता.
ग्रामपंचायतीचे सचिव गावात उपस्थित राहत नाही, बरोबर काम करीत नाही. तसेच कोरोना काळात कोणतेही योगदान नाही अशा विविध तक्रारी ग्रामवासीयांनी पंचायत समितीमध्ये गटविकास अधिकारी यांच्याकडे केल्या होत्या. याच अनुषंगाने सामाजिक कार्यकर्ते मंगेश पाचभाई यांनी पंचायत समिती मध्ये वेळोवेळी लेखी तक्रार देऊन ग्रामविकास पद भरण्याची मागणी लावून धरली होती. परंतु याकडे पंचायत समिती कडून दुर्लक्ष होत असल्याचे लक्षात येताच मंगेश पाचभाई यांनी स्मरण पत्र देत उपोषणाचा इशारा दिला होता.
अखेर पंचायत समितीला जग आली व खळबळून जागे झाले व सचिव प्रांजली वाढई यांची बदली बोपापूर येथे करण्यात आली व ग्रामविकास अधिकारी व्ही गव्हारकर यांची नियुक्ती अडेगाव येथे करण्यात आली. तालुक्यातील अनेक ग्रामपंचायत मधील सचिव मुख्यालयत राहत नसून वणी पांढरकवडा यवतमाळ सारख्या ठिकाणावरून ये जा करीत आहे. त्यामुळे गावातील विकास कामात मोठ्या अडचणी निर्माण होत आहे.
लोकप्रतिनिधी व वरीष्ठ अधिकारी यांचे हेतुपुरस्सर दुर्लक्ष करीत असल्याने ग्रामसेवक कुणालाही जुमानत नसल्याची सुद्धा तक्रार करण्यात असली आहे. शहरी विभागातून येणाऱ्या ग्रामसेवक याना मुख्यालयी राहण्याकरिता आदेश पारित करावे अशीही मागणी करण्यात आले आहे. कोरोना काळात सर्व ग्रामसेवक यांना मुख्यालय राहण्याचे आदेश असतांना बहुतांश ग्रामसेवक बाहेर गावरूनच ये जा करीत होते.
तडफदार तरुण नेतृत्व असलेला समाज सेवक मंगेश पाचभाई यांच्या कार्यामुळे ग्रामपंचायत मधील सचिव यांची बदली करून ग्रामविकास अधिकारी यांची नियुक्ती करण्यात यश प्राप्त झाले आहे. स्वतःला मोठे नेते समजून वावरणारे फक्त स्वतःची पोळी शेकण्यात व्यस्त असतांना सामाजिक बांधिलकी जोपासणारा मंगेश पाचभाई यांचे सर्वस्तरावरून कौतुक होत आहे.
हे देखील वाचा: