सुशील ओझा, झरी: तालुक्यातील अडेगाव येथे अवैध दारुविक्री जोमात सुरू आहे. मुकुटबन येथील विक्रेता दारुचा पुरवठा करीत असून, या अवैध व्यवसायाला पोलिसांचा आशीर्वाद मिळत असल्याचे बोलले जात आहे..
तालुक्यातील सर्वात मोठ्या गावापैकी दुसऱ्या क्रमांकाचे मोठे गाव म्हणून अडेगावची ओळख आहे. या गावात महिलांनी व तरुण युवकांनी खुलेआम सुरू असलेली दारू पकडून दारू विके्रत्यांना पोलिसांच्या ताब्यात दिले होते. त्यांच्यावर कारवाई करून अवैद्य धंद्यावर चांगला वचक आणला होता. याकरिता पोलिसांनी चांगली मदत केली होती. परंतु काही दिवसातच गावातील मद्यपींनी दोन-चार देशी दारूचे शिशा नेऊन लपून विक्री सुरू केली.
पाहता पाहता गावात अशा प्रकारचे दारूविके्रते अनेक उभे झाले. यामुळे पोलिसांना दोन चार शिशा घेऊन जाणाऱ्यावर केसेस करणे सुरू केले. मात्र तरीही दारू विक्री सुरू असल्याचे पाहून गावातील व बाहेरील जुने दारू विक्रेते याचा फायदा घ्यायला लागले आहे. बिट जमादार व शिपायाचा याला आशीर्वाद असल्याचे बोलले जात आहे.
याबाबत पोलिसांना टोकल्यास दोन चार पव्वेवाले लोकांना पकडून केस दाखवून मोठी कामगिरी केल्याचा आव आणत आहे. ठाणेदारांना अंधारात ठेवून अडेगाव येथे निलेश व इतर युवक खुलेआम बसस्टँड, पाण्याच्या टाकीजवळ, तलावाजवळ, सबस्टेशन जवळ, पानटपरिवर खुलेआम दारू विक्री करीत आहे. .
या विक्रेत्यांकडून काही पोलिसांना मोठा फायदा होत असल्याची माहिती आहे. अडेगाव येथील दारुविके्रत्यांना मुकुटबन येथीलच दारू विक्रेता अडेगाव व पुरड येथे दारूच्या पेट्या पोहचवित असल्याची माहिती आहे. याबाबत काही पोलीस कर्मचाऱ्यांना माहिती असून, या दारूविक्रीला ते समर्थन देत आहे. याकरिता या दारूविक्री व दारू पुरवठा करणाऱ्याकडून महिन्याकाठी हप्ता व ओली पार्टी मिळत आहे.
दारू विक्री त्वरित बंद व्हावी, याकरिता ग्रामपंचायत व तरुण युवकासह महिला सरसावल्या असून, अवैद्य दारू विक्री व पुरवठा बंद न केल्यास आंदोलन करण्याच्या तयारीत दिसत आहे..