जागतिक आदिवासी दिनानिमित्त बाईक रॅली व रक्तदान शिबिर

0

विवेक तोटेवार, वणी: 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त वणीत सामाजिक संघटनेद्वारे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन आदिवासी मित्र पुरस्कार प्राप्त व दिडशेच्यावर आदिवासी गाव दत्तक घेतलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस डॉ. महेंद्र लोढा व डाॅ.सुनील जुमनाके यांनी केले.

सकाळी 9 वाजता पाण्याच्या टाकीजवळील भिमालपेन देवस्थान येथून भव्य मोटार सायकल रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये शेकडो लोक सहभागी झाले होते. ही रॅली टिळक चौक ते जिजाऊ चौक चिखलगाव, लोकमान्य टिळक महाविद्यालय, गांधी चौक, दिपक टाॅकीज, आंबेडकर चौक या प्रमुख मार्गाने रॅली निघाली. या रॅली मध्ये जय सेवा बिरसा मंडा की जय चे जय जयघोषाने शहर दुमदुमले होते. रॅलीचा समारोप भिमालपेन देवस्थान इथे झाला.

रॅलीनंतर रक्तदान शिबिराला सुरुवात झाली. वणीतील सुगम हॉस्पिटल व लाईफलाईन ब्लड बँकेच्या माध्यमातून हे शिबिर आयोजित करण्यात आले होते. यात 150 लोकांनी रक्तदान केले. रक्तदान केल्यानंतर रक्तदात्याला एक टिशर्ट, प्रमाणपत्र व डोनर कार्ड वाटण्यात आले.

या कार्यक्रमाच्या उद्घाटना च्या वेळी डाॅ.लोढा म्हणाले की संयुक्त राष्ट्रसंघाच्या स्थापनेनंतर 21 व्या शतकात सुद्धा जगातील आदिवासी समाज निराश्रीत दिसुन येत आहे. आदिवासी जंगलातील द-या खो-यात कंदमुळे, वनफुल जंगली प्राण्याची शिकार करुन उदार निर्वाह करित होते. या सर्व बाबीचे निराकरण करणे अंत्यत गरजेचे होते व ती काळाची गरज सुद्धा असल्यमुळे संयुक्त राष्ट्र सन 1994 मध्ये दरवर्षी 9 ऑगस्ट रोजी जागतीक आदिवासी दिवस साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्या नंतर संपुर्ण जगामध्ये 9 ऑगस्ट जागतीक आदीवासी दिवस साजरा होत आहे. त्यामुळे हा समाज आता लोक प्रवाहा मध्ये येत आहे. समाजानी असेस एकत्र येवुन संघर्ष करुन समाजाच्या हितासाठी कार्य करावे.
या कार्यक्रमाच्या यशस्वी करण्याकरीता स्वप्नील धुर्वे, अॅड.अरविद सिडाम, संतोष चांदेकर, रानु तुमराम, लखन चांदेकर, कपील कोटनाके,सतीश गेडाम,प्रयास कुमरे, यांच्या सह ऑल इंडिया एससी एसटी बीसी कॉन्सिल, ऑल इंडिया आदिवासी एम्पॉईज फेडरेशन, आदिवासी विकास परिषद, गोंडवाना टायगर सेना, गोंडवाना अस्मिता परिवार, गोंडवाना टायगर सेना, आदिवासी एकता मंच,, आदिवासी समिती, तसेच स्वप्निल धुर्वे मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
Leave A Reply

Your email address will not be published.