बसपा तर्फे जागतिक आदिवासी दिवस साजरा

0

बहुगुणी डेस्क: बहुजन समाज पार्टी वणी विधानसभा क्षेत्रातर्फे जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यात आला. संयुक्त राष्ट्र संघाने घोषीत केलेल्या 9 ऑगस्ट या दिवशी वणी शहरातील अनिस हॉल येथे हा दिन मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी महाराष्ट्र राज्य सचिव बसपाचे पंडीतजी दिघाडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी बसपाचे पंडीतजी दिघाडे म्हणाले की देशाच्या जडणघडणीत आदिवासी बांधवांचा सिंहाचा वाटा आहे. आदिवासी बांधव सर्वांना संस्कार आणि संस्कृती दाखवणारे दिशादर्शक आहेत. स्वातंत्र्य चळवळीसह स्वराज्यासाठी त्यांनी केलेले बलिदान हे देशासमोर न फेडता येणारे ऋण आहेत. त्यांचा गौरव करताना उर भरून येतो.

यावेळी बसपाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण खानझोडे म्हणाले की संस्कृतीचे रक्षक आदिवासी बांधव अद्यापही उपेक्षीत असले तरी येणारा काळ हा आदिवासींच्या सर्वांगीण उत्कर्ष करणारा काळ ठरेल. बसपा हा बहुजनांचा पक्ष असून आजही यात समाजातील सर्व घटकांचे हित जोपासण्याचा प्रयत्न केला जातो. समाजातील कोणत्याही घटकांवर अत्याचार झाल्यास बसपा त्याविरोधात सर्वप्रथम उभी असते. हे केवळ बसपाच्या कॅडरमुळे शक्य झाले आहे. असेही ते म्हणाले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष संतोष भादिकर होते, उद्घाटक अशोक भगत होते. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष बसपा प्रविण खानझोडे, शैलेश गाडेकर, माधव कोहळे, विजय वानखडे, अशोक वानखडे, अनिल तामगडे हे मंचावर उपस्थीत होते.

या कार्यक्रमाला वणी, मारेगाव, झरी या तालुक्यातील कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन जयंत साठे यांनी केले तर आभार प्रदर्शन महेश लिपटे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विक्की जंगले, बंडू पेटकर, मारोती आत्राम, सुभाष लासंते आदी कार्यकर्त्यांनी परीश्रम घेतले.

Leave A Reply

Your email address will not be published.