जैन ले आउट येथील गुरूपीठ इंग्लिश मीडियम स्कूलसाठी प्रवेश सुरू
बहुगुणी डेस्क, वणी: शहरातील जैन ले आउट स्थित गुरूपीठ इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये वर्ष 2023 ते 24 या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश सुरू झाले आहेत. गुरुपीठ येथे नर्सरी, केजी 1, केजी 2 सह वर्ग 1 ते वर्ग 7 पर्यंत प्रवेश घेता येणार आहे. माफक दरात सर्वोत्कृष्ट आणि दर्जेदार शिक्षण देण्यासाठी गुरूपीठ इंग्लिश मीडियम स्कूल परिसरात प्रसिद्ध आहे. 20 वर्षांची या शाळेला परंपरा असून या शाळेतील अनेक विद्यार्थी आज मोठ्या पदावर कार्यरत आहे.
विद्यार्थ्यांसाठी सुविधा –
शाळेत विद्यार्थ्यांसाठी अनुभव शिक्षक असून संपूर्ण क्लासरूम ही डिजिटल आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीन विकासासाठी ऍक्टिव्हीटी हॉलची सुविधा आहे. खेळामध्ये विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळण्यासाठी शाळेत विविध इनडोअर व आऊटडोअर खेळ घेतले जातात. शाळेतर्फे बस सुविधा असल्याने शहरातील विद्यार्थ्यांसह बाहेरगावातील विद्यार्थ्यांनाही त्याचा फायदा होतो. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी संपूर्ण शाळाही सीसीटीव्ही सर्विलन्समध्ये आहे.
शाळेत प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांचे आधारकार्ड व जन्म प्रमाणपत्र याची गरज आहे. शाळेत अवघ्या मोजक्या जागा शिल्लक असल्याने पालकांनी लवकरात लवकर संपर्क साधावा असे आवाहन शाळा व्यवस्थापनाद्वारे करण्यात आली आहे.
विद्यार्थ्यांसाठी सुविधा –
माफक प्रवेश शुल्क व शैक्षणिक शुल्क
खेळण्यासाठी विस्तीर्ण व सुरक्षीत मैदान
संपूर्ण अनुभवी व प्रशिक्षीत शिक्षिका
विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासासाठी वाचन साहित्य
वर्षभर विविध सांस्कृतिक, शैक्षणिक उपक्रम व वार्षिक स्नेहसंमेलन
पत्ता: गुरुपीठ इंग्लिश मीडियम स्कूल
हनुमान मंदिरा जवळ, विवेकानंद शाळेच्या अलिकडे, ब्राह्मणी ऑटो पॉइंट जवळ, जैन ले आऊट, वणी
अधिक माहिती व प्रवेशासाठी संपर्क: 9822152396, 8087895618 किंवा स.8 ते दु. 11.30 या वेळेत शाळेच्या कार्यालयात भेट द्यावी
Comments are closed.