वणीतील शासकीय वसतिगृहासाठी प्रवेश प्रक्रिया सुरु

एससी, एसटी, ओबीसी, आर्थिक दृष्ट्या मागास, अपंग, अनाथ विद्यार्थी राहणार पात्र

पुरुषोत्तम नवघरे, वणी: सामाजिक न्याय व विषेश साहाय्य विभाग जिल्हा यवतमाळ अधिनस्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह वणी व मागासवर्गीय तथा आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह वणी येथील वसतीगृहात प्रवेश प्रक्रिया शैक्षणिक सत्र २०२४-२५ करिता सुरू करण्यात आलेली आहे. मागासवर्गीय प्रवर्ग निहाय आरक्षित टक्केवारीनुसार समाजातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या जाती, जमाती, आर्थिक दृष्ट्या तसेच इतर मागास प्रवर्ग, अपंग, अनाथ आदी प्रवर्गातील विद्यार्थी प्रवेशास पात्र राहणार आहे.

शालेय, विद्यालयीन व महाविद्यालयीन वणी येथील नगर परिषद हद्दीतील शाळा, विद्यालय, महाविद्यालयामधील अभ्यासक्रमाच्या प्रथम व द्वितीय वर्षातील प्रवेशित विद्यार्थी प्रवेश अर्ज भरण्यास पात्र राहतील. शालेय अभ्यासक्रमाकरिता प्रवेश अर्ज वाटप सुरू झालेले आहे.

या अनुषंगाने जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्ज भरण्याचे आवाहन मुलांच्या वसतिगृहाचे गृहपाल गृहपाल संजय पराळे व मुलींच्या वसतिगृहाच्या गृहपाल भारती राठोड यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.