अभिकर्ता योगेश पोद्दार यांना MDRT बहुमान

MDRT मिळणारे यावर्षीचे पहिले अभिकर्ते

0

विवेक तोटेवार, वणी: भारतीय जीवन विमा निगम, वणी शाखेचे विमा अभिकर्ता योगेश पोद्दार यांनी MDRT हा बहुमान मिळवला आहे. याआधी त्यांना तिनदा हा बहुमान मिळाला आहे. यावर्षी वणीतील सर्व अभिकर्त्यामध्ये एमडीआरटी हा बहुमान मिळणारे योगेश पोद्दार हे पहिले अभिकर्ते ठरले आहेत.

आववश्यक व्यवसाय केलेल्या विमा अभिकर्त्याला MDRT (मिलियन डॉलर राउंड टेबल) चा बहुमान मिळतो. या राउंड टेबल कॉन्फरंससाठी जगभरातील विमा एजेंट्स सहभागी होतात. जगातील विविध देशातील मोठ्या शहरात हे सेमिनार होतात. यावर्षी हे राउंड टेबल कॉन्फरन्स अमेरिकेतील पेनसेल्वेनिया इथे 8 ते 10 नोव्हेंबर रोजी होणार आहे. या जागतिक संमेलनात सहभागी होण्याची संधी योगेश पोद्दार यांना मिळाली आहे.

केवळ सहा महिन्या टारगेट पूर्ण
MDRT हा बहुमान मिळण्यासाठी वर्षभरासाठी एक टारगेट दिले जाते. यावर्षी कोरोना व लॉकडाऊनमुळे संपूर्ण देशातील परिस्थिती गंभीर आहे. मात्र अशा गंभीर काळातही योगेश पोद्दार यांनी हे टारगेट केवळ सहा महिन्यात पूर्ण केले हे विशेष.

त्यांच्या या गौरवमय कार्याबद्दल वणी शाखेव्दारे त्यांचा सन्मान करण्यात आला. शाखाधिकारी रवींद्र कमाने, शाखा अधिकारी (विक्री) मोरेश्वर राऊत, विकास अधिकारी हेमंतकुमार टिपले आदींनी त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला. त्यांच्या या यशाबद्दल परिसरात कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.