सुशील ओझा, झरी: तालुक्यातील सालेभट्टी येथे 1 जुलै 2021 रोजी कृषीदिन साजरा करण्यात आला. हरीत क्रांतीचे प्रणेते आणि महाराष्टाचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त 1 जुलै हा संपूर्ण राज्यभरात कृषीदिन म्हणून साजरा केला जातो. याच दिनाचे औचित्य साधून पंचायत समिती झरी तथा कृषि विभाग झरी यांच्या संयुक्त विदयमाने कृषिदिनाचा कार्यक्रम उपविभागिय कृषी अधिकारी पांढरकवडा जे. आर. राठोड यांच्या मार्गदर्शनात विनाबाई हायटेक नर्सरी सालेभट्टी येथे पार पडला. यावेळी उपस्थितांनी शेतक-यांना मार्गदर्शन केले तसेच प्रगतशील शेतक-यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
सदर कार्यक्रमाला पं.स. उपसभापती लता आत्राम, गट विकास अधिकारी गजानन मुंडकर, तालुका कृषी अधिकारी आनंद बदखल, पंस सदस्य नागोराव उरवते व विस्तार अधिकारी इसाळकर हे उपस्थित होते. गटविकास अधिकारी गजानन मुंडकर यांनी आधुनिक शेती काळाची गरज याबद्दल मार्गदर्शन केले. कृषी अधिकारी आनंद बदकल यांनी शेतकर्यांना शेतीच्या कृषी विभागामार्फत असणार्या योजणांची माहिती दिली. उपसभापती लता आत्राम, इसाळकर यांच्यामार्फत गत हंगामात चना या पिकाचे विक्रमी उत्पादन घेणारे विणा देवराव कुडमेथे व कृष्णराव कुडमेथे यांचा सत्कार करण्यात आला.
देवराव पाटील कुडमेथे यांनी नर्सरीच्या निर्मिती बाबत आपल्या प्रास्ताविकेतुन मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला कृषी विभागातील हटवार व अटक (मंडळ कृषी अधिकारी), नामदेव किन्नाके व फुलझेले (कृषी पर्यवेक्षक) आर.एस. अप्पलवाड (कृषी सहाय्यक झरी), कु.कविता कुडमेथे (सचिव ग्राम पंचायत जामणी), कल्पना मेश्राम (ग्राम पंचायत,जामणी), पांढरकवडा संपर्क प्रमुख श्रीकांत कुडमेथे, वणी संपर्क प्रमुख अक्षय कुमरे, झरी संपर्क प्रमुख-अविनाश कुडमेथे, महेश कुडमेथे, श्रीराम मेश्राम, निखिल कुडमेथे, गौरव कुडमेथे त्याचबरोबर गावातील तसेच परीसरातील शेतकरी बांधव मोठ्यासंख्येने उपस्थीत होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन गिरी यांनी तर उपस्थितांचे आभार नामदेव किनाके यांनी मानले.
हे देखील वाचा:
सालेभट्टी प्रकरणात तक्रारदारांवर राजकीय दबाव आणण्याचा प्रयत्न
मारेगाव येथे ग्रामीण पत्रकारांच्या विविध मागण्यांसाठी निवेदन