‘हम दो हमारे 12’ सिनेमा वणीत रिलिज करू नये

एमआयएमची मागणी, मुस्लिम महिलांचे अयोग्य चित्रण दाखवण्याचा आरोप

बहुगुणी डेस्क, वणी: ‘हम दो हमारे 12’ हा चित्रपट इस्लाम धर्माच्या विरोधी असल्याचे म्हणत या चित्रपटावर त्वरित बंदी घालावी व सेन्सॉर बोर्ड, दिग्दर्शक, लेखक, अभिनेत्यांविरुद्ध कारवाई करावी, अशी मागणी एमआयएमने केली आहे. यासंदर्भात स्थानिक पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी येथील एसडीपीओंना निवेदन दिले. इस्लाम धर्मामध्ये स्त्रियांना कोणतेच स्थान नसल्याचे चित्रपटात दाखविण्यात आले आहे. एकूणच इस्लाम धर्माला बदनाम करण्याचा कट या चित्रपटाचे लेखक, दिग्दर्शक, अभिनेता यांनी केला असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

मागील काही काळापासून संपूर्ण देशात एका विशिष्ट विचारसरणीच्या लोकांकडून भारतीय मुस्लिमांना बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचेही या निवेदनात म्हटले आहे. मुस्लीम विरोधी चित्रपट प्रदर्शित करून भारतात अशांतता निर्माण करण्याचा हेतू चित्रपट निर्मात्यांचा असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. निवेदन देताना एमआयएम वणी शहर अध्यक्ष आसिम हुसैन, कार्यकारिणी सदस्य अजहर शेख, सय्यद मुफीज, सय्यद मुस्तकीम, साइम अली, शमशुद्दीन शेख, आफताब शेख, राहत शेख, रेहान शेख, आसिफ अली, आरिफ रजा, बिलाल उपस्थित होते. 

हम दो हमारे बारह या मुव्हीचा दोन वर्षांपूर्वी टिझर प्रदर्शित झाला होता  तेव्हापासूनच हा चित्रपट वादाच्या भोव-यात सापडला होता. सिनेमा पूर्ण झाल्यानंतर या सिनेमाचे नाव हमारे बारह असे करण्यात आले. मात्र हा सिनेमा प्रदर्शित करू नये अशी मागणी मुस्लिम संघटनांनी घेतली होती. सध्या सुप्रिम कोर्टाने या सिनेमावर बंद आणली आहे. 

बुकिंगसाठी पोस्टरवर क्लिक करा...

Comments are closed.