ग्राम संवाद सरपंच संघाच्या तालुकाध्यक्षपदी अजय कवरासे

तरुण सरपंचाचाही मिळाला होता मान

1

जितेंद्र कोठारी, वणी: तालुक्यातील ढाकोरी ग्रामपंचायतचे युवा सरपंच अजय पांडुरंग कवरासे यांची नियुक्ती ग्राम संवाद सरपंच संघाच्या वणी तालुका अध्यक्षपदी करण्यात आली आहे. संघाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अजिनाथ धामणे, उपाध्यक्ष प्रमोद भगत, सचिव विशाल लांडगे तसेच यवतमाळ जिल्हा अध्यक्ष विठ्ठल आडे यांच्या उपस्थितीत अजय कवरासे याना नियुक्ती पत्र देण्यात आले. अवघ्या 25 वर्षाच्या तरुण वयात सरपंच संघटनाच्या तालुकाध्यक्ष पदी निवड झाल्यामुळे त्यांचे कौतुक केले जात आहे.

वणी तालुक्यातील शेवटच्या टोक्यावरील ढाकोरी गावाचा तरुण अजय कवरासे हा स्पर्धा परीक्षेची तयारीसाठी जळगाव येथे क्लासेस करीत होता. मात्र लॉकडाउन लागल्यामुळे क्लासेस बंद झाली आणि फेब्रुवारी महिन्यात अजय परत आपल्या गावी परतला. नेमके त्याच वेळी ग्रामपंचायतिच्या निवडणुका लागल्या. आणि अजय कवरासे हा निवडणुकीत उभा राहिला.

शिक्षित, होतकरू व तरुण अजय कवरासे यांची गावचे सरपंच म्हणून निवड झाली. सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात नेहमी अग्रेसर असणाऱ्या अजय कवरासे याना तालुक्यातील सर्वात कमी वयाचा सरपंच असल्याचा बहुमानसुद्दा मिळाला. त्यांच्या कार्याची दखल घेऊन ग्राम संवाद सरपंच संघाने त्यांची तालुकाध्यक्ष पदी नियुक्ती केली.

ग्राम संवाद संघाच्या माध्यमातुन तालुक्यातील सर्व सरपंच व सदस्यांची नियुक्ती करून कार्यकारिणीचे गठन करण्यात येईल. ग्रामविकसासाठी गाव व तालुकास्तरावर कार्यशाळेचे आयोजन करून जनजागृती करण्याचा मानस असल्याचे नवनिर्वाचित तालुकाध्यक्ष अजय कवरासे यांनी व्यक्त केले.

हे देखील वाचा:

लॉकडाऊनमुळे स्पर्धा परीक्षेची तयारी सोडून घरी आला आणि सरपंच झाला

आज तालुक्यात कोरोनाचे 11 रुग्ण, ग्रामीण भागात 7 रुग्ण

तब्बल दोन दिवस मृतदेह होता झाडाला लटकून

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

1 Comment
  1. […] ग्राम संवाद सरपंच संघाच्या तालुकाध्य… […]

Leave A Reply

Your email address will not be published.