युवासेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांचा राजीनामा

स्थानिक पातळीवर कार्यात अडथळे निर्माण होत असल्याचा आरोप

विवेक तोटेवार, वणी: युवासेना उपजिल्हा प्रमुख (वणी विधानसभा) अजिंक्य शेंडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा सादर केला आहे. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांना दिलेल्या पत्राद्वारे त्यांनी स्थानिक पातळीवर कार्यात अडथळे निर्माण होत असल्याची खंत व्यक्त केली आहे. सध्या त्यांनी राजीनामा दिला असला तरी पुढे त्यांनी काय भूमिका घेतात याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. 

Birthday

शेंडे यांनी पत्रात नमूद केले आहे की, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी निष्ठा ठेवून त्यांनी अनेक वर्षे सामाजिक, शैक्षणिक, आरोग्यविषयक व जनसेवेचे उपक्रम राबविले. वणी शहरात युवक-विद्यार्थ्यांशी संपर्क साधून प्रवेश मोहीम, कोविड काळात ऑक्सिजन सिलेंडर उपलब्ध करून देणे, औषध फवारणी, मॅरेथॉनचे आयोजन, छत्री वाटप, सुगंधित तंबाखूविरोधात आंदोलन, तसेच रायगड येथे स्वच्छता मोहीम अशा विविध उपक्रमांत त्यांनी सक्रिय सहभाग घेतला.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांची चार वेळा युवासेना उपजिल्हा प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, अलीकडच्या काळात महत्त्वाच्या बैठका, निर्णयप्रक्रिया व नगरपरिषद सीट वाटप यामध्ये त्यांना विश्वासात घेतले जात नसल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले आहे. वणी शहरातील युवासेना शहर प्रमुख पद दीर्घकाळ रिक्त असून झरी–मारेगाव व मारेगाव तालुक्यातील संघटनात्मक कार्य ठप्प असल्याचीही त्यांनी खंत व्यक्त केली.

“मीच म्हणजे पक्ष” अशी एकाधिकारशाही भूमिका घेत इतर पदाधिकाऱ्यांना डावलले जात असल्याचे त्यांनी आरोप केले आहेत. जिल्हा प्रमुख पदासाठी प्रयत्न करूनही अपेक्षित पाठबळ मिळाले नाही, अशीही त्यांनी खंत व्यक्त केली. या सर्व परिस्थितीमुळे मन व्यथित झाल्याने स्वाभिमान जपत त्यांनी युवासेना उपजिल्हा प्रमुख (वणी विधानसभा) पदाचा राजीनामा दिला असून, पक्ष व नेतृत्वाबद्दल कायम आदर राहील, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

Comments are closed.