पंचवटी अपार्टमेंट येथील रहिवासी सुभाष तोटेवार यांचे निधन
आर्किटेक्ट शैलेश तोटेवार यांना पीतृशोक, आज स. 10 वा. अंत्यविधी
विवेक तोटेवार, वणी: शहरातील पंचवटी अपार्टमेंट, वरोरा रोड परिसरातील रहिवासी तथा आर्किटेक्ट शैलेश तोटेवार यांचे वडील सुभाष गणपतराव तोटेवार (वय 82) यांचे आज शुक्रवार दिनांक 27 फेब्रुवारी 2026 रोजी दुपारी 12:30 वाजता हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाची वार्ता समजताच परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आली. शांत, मनमिळावू व समाजाभिमुख व्यक्तिमत्त्व म्हणून ते परिचित होते. सुभाष तोटेवार यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, चार मुली, नातवंडे तसेच मोठा आप्तेष्ट व मित्रपरिवार असा परिवार आहे. त्यांच्या जाण्याने वणी शहरात दुःखाचे सावट पसरले आहे.

त्यांचा अंत्यविधी शनिवार दिनांक 28 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 10:00 वाजता वणी येथील मोक्षधाम येथे होणार आहे. अंत्ययात्रा राहत्या घरून पंचवटी अपार्टमेंट, वरोरा रोड येथून सकाळी निघणार आहे. तोटेवार यांच्या निधनाबद्दल बेलदार समाज बहुउद्देशीय संस्था, वणी तसेच समस्त बेलदार समाज, वणी यांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे. त्यांच्या आठवणी समाजात सदैव जिवंत राहतील.



Comments are closed.