होतकरू आकाशला हवा मदतीचा हात, नागपूर येथे उपचार सुरू

जितेंद्र कोठारी, वणी: आकाश हा एक होतकरू तरुण. अतिशय गरीब व सामान्य कुटुंबातून आलेला आकाश सध्या एका आजाराशी झुंजतोय. डॉक्टरांनी उपचारासाठी 3 लाखांचा खर्च सांगितला आहे. परिसरातील नागरिकांनी सामाजिक दायीत्व जपत 50 हजारांची आर्थिक मदत केली आहे. मात्र ती अत्यल्प आहे. आकाशला आणखी 3 लाख रुपयांच्या आर्थिक मदतीची गरज असून शहरातील दानशूर व्यक्तींनी पुढे यावे असे आवाहन आकाशच्या आईने केले आहे. 

आकाश विजय बागडे (21) हा वणीतील नांदेपेरा रोड, बँक कॉलोनी येथील रहिवासी आहे. तो एका गरीब कुटुंबातून येतो. त्याचे वडील हमाली करतात. तर आई दुस-यांच्या घरी स्वयंपाक करण्याचे काम करते. कुटुंबाला हातभार लागावा म्हणून आकाश देखील एका ठिकाणी खासगी काम करतो. तीन दिवसांआधी आकाशची तब्येत अचानक बिघडली. त्यामुळे त्याला वणीतील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र वणीत उपचार शक्य नसल्याने डॉक्टरांनी त्याला नागपूर येथे रेफर केले.

आकाशला नागपूर येथील सुश्रुत हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. आकाशला दर रोज 45 हजारांचे 3 इंजेक्शन द्यावे लागणार आहे. 5 दिवसांचा हा कोर्स आहे. डॉक्टरांनी उपचाराचा खर्च 3 ते 4 लाख रुपये सांगितला आहे. बागडे कुटुंबीयांची इतका खर्च करण्याची परिस्थिती नाही. त्यामुळे बँक कॉलोनी परिसरातील नागरिकांनी पुढाकार घेत वर्गणी गोळा केली व 50 हजार रुपये जमा केली. ही रक्कम त्यांनी उपचासाठी पाठवली. मात्र ही मदत पुरेशी नाही.

आकाश हा बागडे कुटुंबातील एकुलता एक मुलगा आहे. होतकरू असलेल्या आकाशला सध्या दानशुरांच्या मदतीची गरज आहे. त्यामुळे शहरातील दानशुरांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन आकाशच्या आईने केले आहे. वणीकरांनी वेळोवेळी गरजूंना मदत केली आहे. यावेळी त्यांनी किमान 100 रुपयांपासून अधिकाधिक जी आर्थिक मदत होईल ती करावी, असे आवाहन बँक कॉलोनीतील नागरिकांनी केले आहे.

मदतीसाठी बँक डिटेल्स –
Ac Name: Saroj Vijay Bagade
Ac no. 35300708014
State bank of india
Sai mandir branch
IFSC CODE: SBIN0014691
गुगल पे क्रमांक – 9096086154 (सायली वझलवार – रुग्णाचे नातेवाईक)

Comments are closed.