माहूरगड येथील रेणुकामातेची अखंड ज्योत येणार वणीत

आंबेडकर चौक येथील दुर्गा माता मंदिरात होणार घटस्थापना

जितेंद्र कोठारी, वणी : जीर्णोद्धारनंतर दुर्गा माता मंदिरात नवरात्री उत्सवासाठी खास माहूरगड येथून रेणुका मातेची अखंड ज्योत आणण्यात येणार आहे. यवतमाळ जिल्ह्यातील माहूरगड येथील श्री रेणुकामाता देवस्थान हे महाराष्ट्रात असणा-या साडे 3 शक्ती पीठांपैकी आहे. आंबेडकर चौक स्थिती दुर्गामाता मंदिर समितीतर्फे यंदाचे नवरात्र महोत्सव भव्य स्वरूपात साजरा करण्याची तयारी केली जात आहे. त्या अनुषंगाने माहूर येथून अखंड ज्योत प्रज्वलित करून दुर्गामाता मंदिरात घटस्थापना करण्याचे ठरले आहे.

दुर्गा माता मंदिराचे जीर्णोद्धार करण्यात आले असून या नवरात्र घटस्थापनेच्या मुहूर्तावर मंदिर भक्तांसाठी खुले केले जाणार आहे. घटस्थापनेसाठी 15 ऑक्टो. रोजी सकाळी 4 वाजता माहूर येथून अखंड ज्योत घेऊन समितीचे पदाधिकारी वणीसाठी निघणार आहे. सायंकाळी 5 वाजता दरम्यान अखंड ज्योत यात्रेचे वणीत आगमन होणार आहे. यावेळी अखंड ज्योत यात्रेचे शहरात भव्य स्वागत करून अखंड ज्योत दुर्गामाता मंदिरात भाविकांच्या दर्शनासाठी ठेवली जाणार आहे.

श्री क्षेत्र माहूरगड येथून अखंड ज्योत आणण्यासाठी दुर्गामाता मंदिर समितीचे अध्यक्ष रवी बेलुरकरसह दौलत वाघमारे, प्रमोद लोणारे, चंदन मोहुले, नितीन बिहारी, राजकुमार अमरवानी, शिवा आसुटकर, पुरुषोत्तम मांदळे, अमोल बदखल, राजेंद्र जयस्वाल, स्वप्निल बिहारी, मारोती गोखरे जाणार आहे. पवित्र अखंड ज्योतचे शहरात स्वागत व दर्शन  करण्यासाठी मोठ्या संख्येने भाविकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन अध्यक्ष रवी बेलुरकर यांनी केले आहे.   

Comments are closed.