वणी येथील अक्षरा बारचा परवाना कायमस्वरूपी रद्द

प्रशासनाची लॉर्ड्स आणि मार्डीच्या बारवर मेहरबानी का ?

0

जब्बार चीनी, वणी: संचारबंदीचे उल्लंघन करून अवैधरित्या दारू विक्री केल्या प्रकरणी वणी येथील अक्षरा रेस्टोरेंट ऍन्ड बारचा परवाना जिल्हाधिकारी यांनी कायमस्वरूपी रद्द करण्यात आला आहे. गुरूवारी मध्यरात्री उप विभागीय पोलीस अधिकारी यांनी या बारवर कारवाई केली होती. या प्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली होती.

संचारबंदीमध्ये करण्यात आलेली ही सर्वात मोठी कारवाई होती. या प्रकरणात 4 लाख 23 हजारांच्या दारूसह, कार व मोपेड असा सुमारे 15 लाखांचा मुद्देमाल जप्त केला होता. बारचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्यात यावा अशी मागणी करण्यात येत होती.

महाराष्ट्र दारूबंदी कायदाचे कलम 56 (1) अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी मे. अक्षरा रेस्टारेन्ट व बार (एफ एल-3 अनुज्ञप्ती क्रमांक 152 वणी) हा परवाना रद्द कायम स्वरूपी रद्द करण्याचा आदेश पारीत केला आहे व रात्री या बारचा परवाना कायमस्वरुपी रद्द करण्यता आला.

अक्षरा बारवर कारवाई पण लॉर्ड बारवर मेहरबानी का?

अवैधरित्या दारू विक्री केल्या प्रकरणी वरोरा रोडवरील लॉर्ड्स बारवर कारवाई करण्यात आली होती. पोलिसांना या बारमधला एक कर्मचारी अवैधरित्या दारू विक्री करताना आढळला होता. त्यांच्याजवळ 4 हजारांची दारूही आढळून आली. या प्रकरणी उत्पादन शुल्क विभागाने बारला सिल केले. मात्र आज 20 दिवसांपेक्षा अधिक कालावधी लोटला तरी त्या बारवर अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे वणीतील अनेक सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील लोक नाराजी व्यक्त करीत आहे. अक्षरा बारचा परवाना रद्द केल्याची बातमी पसरताच या बारवर मेहेरबानी का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. अवैध दारू विक्री प्रकरणी मार्डीच्या बारलाही सिल करण्यात आले, मात्र त्या बारवरही अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही.

मार्डी येथील बारवरही करण्यात आली होती कारवाई

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.