अक्षय मोबाईल शॉपी शाखा 3 चे 19 जूनला उद्घाटन
सुप्रसिद्ध बॉडीबिल्डर सुहास खामकर यांच्या हस्ते होणार शुभारंभ; आकर्षक आकर्षक ऑफर सुरू
बहुगुणी डेस्क, वणी: वणी शहरातील मोबाईल व इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील विश्वासार्ह नाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अक्षय मोबाईल शॉपीच्या तिसऱ्या शाखेचे उद्घाटन शुक्रवार, दि. 19 जून 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता मोठ्या उत्साहात होणार आहे. या नवीन शाखेचे उद्घाटन भारतातील पहिले IFBB प्रो कार्डधारक सुप्रसिद्ध बॉडीबिल्डर सुहास खामकर यांच्या हस्ते संपन्न होणार असून या सोहळ्यास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
अक्षय मोबाईल शॉपीने आपल्या 2 शाखेच्या माध्यमातून ग्राहकांचा विश्वास संपादन केला आहे. ग्राहकांचा वाढता प्रतिसाद आणि आधुनिक मोबाईल खरेदीचा उत्तम अनुभव देण्याच्या उद्देशाने आता तिसरी शाखा ग्राहकांच्या सेवेत दाखल होत आहे. नव्या शाखेत आयफोन, सॅमसंग, विवो, ओप्पो, रियलमी, वनप्लस, मोटोरोला यांसारख्या नामांकित ब्रँडचे मोबाईल तसेच विविध इलेक्ट्रॉनिक उत्पादने उपलब्ध राहणार आहेत. यासह मोबाईल असेसरीजचेही मोठी रेंज येथे उपलब्ध आहे.
उद्घाटन सोहळ्याच्या निमित्ताने ग्राहकांसाठी विशेष ऑफर्सदेखील जाहीर करण्यात आल्या असून मोबाईल खरेदीसाठी आधुनिक व सुलभ सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
कॅशबॅक व ईएमआय सुविधाही उपलब्ध
अक्षय मोबाईल शॉपीमध्ये ग्राहकांना ऑनलाईन पेमेंट, डेबिट-क्रेडिट कार्ड पेमेंट तसेच ईएमआय सुविधेवर मोबाईल खरेदी करता येणार आहे. निवडक मॉडेल्सवर आकर्षक कॅशबॅक ऑफर उपलब्ध असून ईएमआयवर मोबाईल खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी झिरो डाऊन पेमेंटची सुविधादेखील देण्यात आली आहे. तसेच आयफोन खरेदीदारांसाठी नो-कॉस्ट ईएमआय सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
दोन होतकरू भावांच्या मेहनतीचे यश
अक्षय मोबाईल शॉपीमागे दोन होतकरू भाऊ अक्षय बोकडे आणि स्वप्नील बोकडे यांची जिद्द, मेहनत आणि ग्राहकांप्रती असलेली बांधिलकी आहे. अत्यंत सामान्य परिस्थितीतून व्यवसायाची सुरुवात करत त्यांनी प्रामाणिक सेवा, दर्जेदार उत्पादने आणि ग्राहकांचा विश्वास या बळावर पहिल्या 2 शाखा यशस्वीपणे उभ्या केल्यात. ग्राहकांकडून मिळालेल्या भरघोस प्रतिसादामुळे आज तिसरी शाखा सुरू करण्याचे स्वप्न साकार झाले आहे. त्यांच्या या यशस्वी वाटचालीचे शहरातून कौतुक होत असून युवा उद्योजकांसाठी ते प्रेरणादायी उदाहरण ठरत आहेत.

अधिक माहितीसाठी संपर्क
अक्षय बोकडे : 8625840840
स्वप्नील बोकडे : 8208877816
पत्ता: अक्षय मोबाईल शॉपी, मस्जिदजवळ, ताज इंजिनिअरिंग समोर, विराणी हॉल परिसर, वणी.
Comments are closed.