नांदेपेरा ग्रामपंचायतीच्या शिपाई पदाच्या परीक्षेत घोळ झाल्याचा आरोप
SDO, CEO यांच्याकडे तक्रार, परीक्षा पुन्हा घेण्याची मागणी
बहुगुणी डेस्क, वणी: नांदेपेरा ग्रामपंचायतीच्या शिपाई पदभरतीसाठी घेण्यात आलेल्या परीक्षेत घोटाळा झाल्याचा आरोप गावातील काही नागरिकांनी केला आहे. याबाबत उपविभागीय अधिकारी, जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे.
दिनांक 30 जानेवारी रोजी ग्रामपंचायत नांदेपेरा येथील शिपाई पदासाठी परीक्षा घेण्यात आली. पंचायत समिती वणी तर्फे ही परीक्षा घेण्यात आली. या पदासाठी 10 उमेदवारांनी अर्ज केला होता. परीक्षा झाल्यानंतर याचा निकाल तोंडी जाहीर करण्यात आला. या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवाराला शिक्षणाचा कोणताही गंध नाही, असा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे.
याबाबत गावातील काही नागरिकांनी उपविभागीय अधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल केली. तक्रारीत म्हटले आहे की विद्यार्थ्यांची आसन व्यवस्था बदलवण्यात आली. सर्व परीक्षार्थींचे गुण जाहीर करावे, परीक्षा पारदर्शी पद्धतीने झाली नाही, तसेच पुन्हा परीक्षा घ्यावी या मागण्या तक्रारीत करण्यात आली आहे. निवेदनावर सचिन चिकटे, तुषार खामनकर, पवन कोडापे, अजय किन्हेकर, राहुल वांढरे, धीरज खामनकर, प्रवीण खैरे, साहील ठमके, प्रफुल्ल पावडे इत्यादींचा सही आहेत.
Comments are closed.