भीषण अपघात- रुग्णवाहिकेची दुचाकीला जबर धडक

रिलायन्स मॉल मधील व्यवस्थापक जागीच ठार,.. वणी वरोरा मार्गावर सावर्ला जवळील घटना

जितेंद्र कोठारी. वणी : येथील रिलायन्स स्मार्ट स्टोर मध्ये डिपार्टमेंट मॅनेजर पदावर कार्यरत युवकाच्या दुचाकीला भरधाव रुग्णवाहिकेनी जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात आनंद झा (36) या युवकाचा घटनास्थळी दुर्देवी मृत्यू झाला. सोमवारी रात्री 11 वाजता दरम्यान वणी वरोरा मार्गावर सावर्ला गावाजवळ ही घटना घडली. दुचाकीला धडक लागताच युवकाची इव्हेंजर दुचाकीने पेट घेतला.

प्राप्त माहितीनुसार येथील शेवाळकर परिसरातील रिलायन्स स्मार्ट मॉलमध्ये डिपार्टमेंट मॅनेजर म्हणून कार्यरत आनंद झा हा स्टोर बंद झाल्यावर रात्री 10 ते 11 वाजता दरम्यान नेहमी दुचाकीने वरोरा येथे आपल्या घरी जात होता. सोमवार 7 नोव्हे. रोजी आनंद दुचाकीने जात असताना सावर्ला गावजवळ एका भरधाव ऍम्ब्युलन्सने त्याच्या दुचाकीला समोरून धडक दिली. रुग्णवाहिकेने धडक देताच दुचाकीस्वार आनंद झा हा दूर फेकला गेला. त्याच्या डोक्याला मार लागून तो जागीच गतप्राण झाला. तर अपघातानंतर दुचाकीने पेट घेऊन जळून खाक झाली.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

हसतमुख व मितभाषी आनंद झाच्या अपघाती निधनाची माहिती मिळताच रिलायन्स स्टोर्स मधील कर्मचारी वरोरा पोहचले. आज दुपारी 4 वाजता दरम्यान वरोरा येथील मोक्षधाम मध्ये त्याचे अंत्यसंस्कार करण्यात आले. मृतक आनंद झा याच्या मागे पत्नी,लहान मुलगा, भाऊ, आई वडील आहे.

Comments are closed.