नांदेपेरा: नांदेपेरा येथून 3 किमी अंतरावर असलेल्या शेलू (खु) येथील महादेव श्रावण चटकी (85) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. गावाजवळच असलेल्या दिंगाबर आवारी यांच्या शेतातील उन्हाळ मांडवाच्या फाट्याला त्यांनी गळफास घेतला. आज मंगळवारी संध्याकाळी 6 वाजताच्या दरम्यान ही घटना घडली. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली व एक मुलगा आहे. आत्महत्येचे कारण अद्याप कळू शकले नसले तरी आजारपणाला कंटाळून त्यांनी आपली जीवनयात्रा संपवल्याची प्राथमिक माहिती आहे.
निकेश जिलठे - संपादक वणी बहुगुणी
2007 पासूून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. ग्रामीण व शहरी असा पत्रकारितेचा अनुभव. आजतक, झी, जय महाराष्ट्र, टीव्ही 9 इत्यादी आघाडीच्या टीव्ही मीडियात मुंबई येथे विविध पदावर 10 वर्ष कार्यरत. सध्या एका पीआर एजन्सीचे संचालक तसेच वणी बहुगुणी या वेबसाईटचे मुख्य संपादक. यवतमाळ जिल्ह्यातील पहिले न्यूज पोर्टल वणी बहुगुणी या स्थानिक न्यूज पोर्टलच्या माध्यमातून परिसरातील ज्येष्ठ व नव्या दमाच्या पत्रकारांसह वणी व परिसरातील बातम्या व ताज्या घडामोडी पोहोचवण्याचा एक प्रयत्न. सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक विषयावर विविध माध्यमात लिखाण. राज्यातील अनेक ज्येष्ठ नेते व मंत्री यांचे मीडिया कन्सलटन्ट म्हणूनही कार्य.
Next Post