वणीत अण्णाभाऊ साठे जयंती साजरी
अण्णाभाऊंनी दिलेला लढाऊ वारसा पुढे नेणे गरजेचे - संजय देरकर
विवेक तोटेवार, वणी: लोकशाहीर व साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे आज यांची 100 जयंती वणी येथे साजरी करण्यात आली. कोरोनाच्या पार्श्वभूमी अत्यंत साधेपणाने ही जयं ती साजरी करण्यात आली. अण्णाभाऊ साठे यांच्या तैलचितत्राचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले. तर चिमुकल्यांनी यावेळी केक कापला, या कार्यक्रमाला संजय देरकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
अण्णाभाऊंनी दिलेला लढाऊ वारसा जपणे गरजेचे – संजय देरकर
यावेळी मनोगत व्यक्त करताना संजय देरकर म्हणाले की समाजातील वास्तव अण्णाभाऊंनी आपल्या साहित्यातून मांडले. त्यांचे साहित्य वैश्विक होते. शेकडो भाषेत त्यांचे साहित्य भाषांतरीत झाले. त्यामुळे अण्णाभाऊ संपूर्ण जगात पोहोचले. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतही त्यांचे कार्य अमुल्य आहे. आज कोरोनाच्या काळात अण्णाभाऊ यांचे साहित्य सर्वसामान्य माणसांना जगण्याची प्रेरणा व प्रोत्साहन देणारे आहे. त्यांनी दिलेले लढाऊ वारसा पुढे नेणे हिच अण्णाभाऊंना खरी आदरांजली आहे.
– संजय देरकर
चंदन पळवेकर यांनी यावेळी मनोगत व्यक्त करिताना अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे निवेदन प्रा. शैलेश खडसे यांनी केले तर आभार अमोल बावणे यांनी मानले. कार्यक्रमात नामदेव ससाने, महादेव जाधव, सोनु पेंदोर, नरेश ससाणे, कमलेश खडसे, राजेश खडसे, ललित बावने, सचिन बावणे, सचिन शेंडे, सतिश जाधव यांची उपस्थिती होती.