वणी बाजार समिती मार्फत सी.सी.आयची कापूस खरेदी सुरु
शुभारंभाला 7020 रुपये दराने 78 क्विंटल कापूस खरेदी
पुरुषोत्तम नवघरे, वणी: कृषि उत्पन्न बाजार समिती, वणी मार्फत हंगाम २०२३-२४ करीता किमान आधारभुत दराने (हमीभाव) दिनांक २२/११/२०२३ पासून सी.सी.आयची कापूस खरेदी सुरू झाली. अकोला विभागात सीसीआयची कापूस खरेदी करणारी पहिली एपीएमसी वणी ठरली आहे. वणी बाजार समितीचे मुख्य आवारात ही कापूस खरेदी करण्यात आलेली आहे. हर्षद दिलीप बोढाले, रा पुनवट हे कापूस खरेदी केलेले पहिले शेतकरी ठरले. यांचा शाल व श्रीफळ देवून सत्कार करण्यांत आला. शुभारंभाचे दिवशी अंदाजे ७८ क्विंटल कापूस खरेदी करण्यांत आला. तर कापसाला प्रति क्विंटल रुपये ७०२०/- हा भाव देण्यांत आलेला आहे.
सदर कापूस खरेदीचा शुभारंभ बाजार समितीचे सन्माननिय सभापती अँड विनायकराव पुं ओकरे, उपसभापती विजय शा गारघाटे, सचिन कुळमेथे, सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, वणी, हेमंत ठाकरे सी.सी आय वणी चे केंद्र प्रमुख व सदस्य सर्वश्री दिलीप बोढाले, मोहन वरारकर, प्रभाकर बोढे, वेणुदास काळे, हेमंत गौरकार, बद्रकात हिकरे, सतिश बडघरे, रविंद्र कोगरे, प्रमोद सोनटक्के याचे शुभहस्ते करण्यात आला.
शुभारंभ प्रसंगी सी सी आय शिदोला चे केंद्र प्रमुख पंकज ठाकरे, राळेगावचे केंद्र प्रमुख अमित कोहळे, भद्रावतीचे केंद्र प्रमुख विजय आकोटकर, खैरीचे केंद्र प्रमुख श्री प्रमोद पाटील, पांढरकवडयाचे केंद्र प्रमुख श्री हर्षल शिंदे, बाजार समितीचे सचिव श्री अशोक झाडे, श्री शैलेश मडावी, सहकार अधिकारी, सहा निबंधक, सह. सं. वणी, लेखापाल रमेश पुरी, श्री आरीफखाँ रऊफखाँ, निरीक्षक तथा सर्व कर्मचारी व शेतकरी उपस्थित होते. शेतकरी बंधु यांनी आपला कापूस किमान आधारभुत दराने विक्री करीता आणत असतांना सोबत अदयावत पिकपेरा असलेला सातबारा व आधार कार्ड (बैंक पासबुक व मोबाईल नंबर लिंक असलेल) आणने अनिवार्य आहे.
तरी सर्व शेतकरी बघुनी सी.सी. आयला हमी भावाने कापूस विक्री करण्याकरीता बाजार समितीचे मुख्य आवारांत आणावा. असे बाजार समिती तर्फे आव्हान करण्यांत आले आहे.
Comments are closed.