रोहण आदेवार, जोतिबा पोटे मारेगाव: मारेगाव कडून वणी कडे ऑटो क्रमांक MH29AN0373 जात असताना रविवारी दुपारी 3 वाजताच्या दरम्यान महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या गडचिरोली बसने समोरील ऑटो क्रमांक MH29AN0373 या वाहनाला धडक दिली. ओव्हरटेक करण्याच्या नादातऑटोचे नियंत्रण सुटले.
ऑटो रस्त्याच्या कडेला पडला त्यात वाहनचालक गोलू खान याचा जागीच मृत्यू झाला असून त्याचे वडील गंभीर जखमी झाले त्यांना लोढा हॉस्पिटल वणी येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. नाहिदखाँन माबुदखाँन वय २३ ,माबुदखाँन हुसेन खान वय५२ दोघेही राहणार पंचशील नगर वणी, हे अॅपे क्र.एम.एच.२९,ए.एन.०३७३ घेऊन वणी कडे जात असताना मांगरुळ गौराळा दरम्यान मागून येणाऱ्या गडचिरोली आगाराची बस क्र.एम.एच.४९ वाय ५६०४ ने अॅपेला जोरदार धडक दिल्याने अॅपे पलटी होऊन दूर फेकला गेला.
दरम्यान त्यात बसून असलेला नाहिदखाॅन माबुदखान २३ हा जागीच ठार झाला तर माबुदखान हुसेन खान ५२ हे गंभीर जखमी झाले. जखमीला वणी येथे खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले मारेगाव येथे भांडे विकण्याकरिता आलेले वणीचे महाबूब खान व गोलू खान हे दोघे बाप लेक मारेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या चुना फॅक्टरी जवळ मारेगाववरून वणीला आपले भांडे विकण्याचे काम आटपून भांड्याच्या गाडीने ऑटोने जात होते.
मारेगाव ते वणी जाणाऱ्या महामंडळाच्या बसने समोरील भांड्याच्या ऑटोला गाठून गाडी समोर घेण्याच्या बेतात गाडी महामंडळाची बस इतकी लगत आली की ऑटोवाल्याचे सदर वाहनावरील नियंत्रण सुटले व तीनचाकी वाहन रस्त्याच्या कडेला पलटी झाले त्यात वाहनात उपस्थित गोलू खान यांना गंभीर मार लागल्याने ते जागीच ठार झाले.
त्याचे वडील महाबूब खान यांना गंभीर इजा असल्याने त्यांना वणीच्या लोढा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताची माहिती मारेगाव पोलिसांना मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले त्यात मृतकाला शव विच्छेदनासाठी मारेगाव येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून पुढील कारवाई ठाणेदार दिलीप वडगावकर यांच्या मार्गदर्शनात मारेगाव पोलीस करीत आहे.
निकेश जिलठे - संपादक वणी बहुगुणी
2007 पासूून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. ग्रामीण व शहरी असा पत्रकारितेचा अनुभव. आजतक, झी, जय महाराष्ट्र, टीव्ही 9 इत्यादी आघाडीच्या टीव्ही मीडियात मुंबई येथे विविध पदावर 10 वर्ष कार्यरत. सध्या एका पीआर एजन्सीचे संचालक तसेच वणी बहुगुणी या वेबसाईटचे मुख्य संपादक. यवतमाळ जिल्ह्यातील पहिले न्यूज पोर्टल वणी बहुगुणी या स्थानिक न्यूज पोर्टलच्या माध्यमातून परिसरातील ज्येष्ठ व नव्या दमाच्या पत्रकारांसह वणी व परिसरातील बातम्या व ताज्या घडामोडी पोहोचवण्याचा एक प्रयत्न. सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक विषयावर विविध माध्यमात लिखाण. राज्यातील अनेक ज्येष्ठ नेते व मंत्री यांचे मीडिया कन्सलटन्ट म्हणूनही कार्य.
Prev Post