झरी तालुक्यातील 14 ग्रामपंचायतीवर प्रशासकाची नेमणूक
6, 8 व 21 मेला होणार ग्रामपंचायतचा कार्यकाळ पूर्ण
सुशील ओझा, झरी: सधा कोरोनामुळे ग्रामपंचायत निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. दिनांक 6, मे 8 मे व 21 मेला तालुक्यातील 14 ग्रामपंचायतीचा कार्यकाळ पूर्ण होत आहे. त्यामुळे या ग्रामपंचायतीवर प्रशासनकांची नेमणूक करण्यात आली आहे. यासाठी तीन प्रशासकांची नेमणूक करण्यात आली आहे.
एप्रिल ते जून महिन्यात मुदत संपणाऱ्या व नव्याने स्थापित 1570 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम घोषित करण्यात आला होता. मात्र कोरोनामुळे या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. राज्य निवडणूक आयोगाने 17 मार्च 2020 अनवेय 19 जिल्ह्यातील 1570 ग्रामपंचायतीचे निवडणूक कार्यक्रम ज्या टप्प्यात असेल त्याच टप्प्यावर पुढच्या आदेशपर्यंत स्थगिती करण्यात आली आहे.
राज्य निवडणूक आयोगाच्या 24 फेब्रुवारी 2020 च्या पत्रान्वये एप्रिल 2020 ते जून 2020 या कालावधीत सार्वत्रिक निवडणुका घोषित झालेल्या ग्रामपंचायतीचा कार्यकाळ संपुष्टात आलेला आहे. अश्या ग्रामपंचायतीचे अधिकार व कर्तव्य पार पाडण्याकरिता महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 च्या कलम 35 नुसार प्रशासक अधिकारी म्हणून गटविकास अधिकारी सुधाकर जाधव यांची नियक्ती करण्यात आली असून त्यांच्याकडे अर्धवन पांढरकवडा (ल) हिरापूर पिंपरड राहणार आहे.
विस्तार अधिकारी एम बी चव्हाण यांच्याकडे बोपापुर, सुर्ला, वेदड, खातेरा व शिंदीवाढोना तर विस्तार अधिकारी सचिन पाटील यांच्याकडे दाभाडी पिवरडोल मांगुर्ल चीचघाट गवारा राहणार आहे. दाभाडी ग्रामपंचायत ची कालावधी 8 मे तर हिरापूर 21 असून उर्वरित सर्वच ग्रामपंचायतची कालावधी 6 मे आहे.