अबब…महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू..?
सोशल मीडियावर व्हायरल व्हिडीओ क्लिपमुळे उडाला गोंधळ
जितेंद्र कोठारी, वणी: महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू, केंद्रीय मंत्रिमंडळाच्या शिफारशींवर राष्ट्रपती यांनी स्वाक्षरी केली असून राज्यात आजपासून राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. टीव्ही 9 न्युज चॅनेलवर सुरु या बातमीचा व्हिडीओ क्लिप शुक्रवार 1 एप्रिल रोजी सकाळ पासून सोशल मीडियावर संपूर्ण राज्यात व्हायरल झाला. व्हायरल मेसेज बघून अनेकांची भुवऱ्या उंचावली. मात्र जेव्हा हा क्लिप खरी नसून एप्रिल फुल गंमत म्हणून जुन्या बातमीचे क्लिप असल्याचे कळताच लोकांनी सुटकेचा श्वास सोडला.
राज्यातील महाविकास आघाडीमध्ये सुरु असलेली अंतर्गत धुसपुस व मंत्रिमंडळातील काही मोठे नेत्यांवर भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे सद्य राज्यात अस्थिरतेचे वातावरण सुरु आहे. विरोधी पक्ष भारतीय जनता पार्टीच्या काही नेत्यांकडून महाविकास आघाडीची सरकार पाडण्याचे दावे केले जात आहे. अशातच 1 एप्रिल रोजी व्हायरल या व्हिडिओमुळे चांगलीच खळबळ उडाली. मात्र हा व्हिडीओ खरा नसून एप्रिल फूल बनविण्याच्या हेतूने व्हायरल करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.
व्हायरल झालेला हाच तो व्हिडीओ–
हे देखील वाचा:
Comments are closed.