आशा व गटप्रवर्तकांच्या वतीने वणी येथे झाला लाक्षणिक संप

प्रलंबित मागण्या पूर्ण करण्याची मागणी

0

जितेंद्र कोठारी, वणी: आशा गटप्रवर्तकांचा प्रलंबित मागण्यांसाठी केंद्र व राज्य सरकारकडे वारंवार आंदोलनाच्या माध्यमातून पाठपुरावा करूनही दुर्लक्ष केले जात आहे. त्याच्या निषेधार्थ आशा व गटप्रवर्तकांच्या राष्ट्रीय फेडरेशनच्या वतीने सोमवारी लाक्षणिक संप करण्यात आले

कोरोनाकाळात आशा गटप्रवर्तकांना नियमित कर्मचाऱ्याप्रमाणे राबविले जात आहे.परंतु त्यांना योग्य मोबदला दिला जात नाही. सर्वेक्षणाला गेल्यावर अनेकदा त्यांना अपमानास्पद वागणूक मिळते कधीकधी हल्लेसुद्धा होतात. कोरोनाकाळात सक्षम व समर्थपणे सेवा देणाऱ्या आघाडीच्या कामगारांना कोविडयोद्धा म्हणून गौरविण्यात आले.

ही अभिमानाची बाब असली तरी त्यांना काम करताना अनेक आशांना स्वतःचे प्राण गमवावे लागले. त्यांच्याकडे शासनाचे दुर्लक्ष होत आहे. असे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे.

आशा गटप्रवर्तकांना शासकीय सेवेत सामावून घ्यावे व किमान वेतन २२ हजार रुपये द्यावे ही मागणी होती. या लाक्षणिक संपात जिल्यातील आशा गटप्रवर्तकांनी सहभाग घेतला. सिटू (CITU) संघटना जिल्हा यवतमाळ तालुका येथील तालुका अध्यक्ष मेघा बांडे, सचिव किरण बोनसुले, जिल्हा अध्यक्ष कॉ. शंकर दानव,

कविता कुबडे, अल्का बोरापे, सीमा मून, चंदा पथाडे, ज्याती मालेकर, प्रतिभा लांजेवार, कल्पना मजगवळी, शुभांगी डोंगरे, माधुरी कांबळे, वर्षा गोवारदिपे, भावना मेश्राम, शीला नळे, प्रतिभा बाराहाते इत्यादी आशा यावेळी सहभागी होत्या.

हेदेखील वाचा

अल्पवयीन मुलीला सारखे मॅसेज करणे पडले महागात

हेदेखील वाचा

अवैधरित्या रेती वाहतूक करणारा ट्रॅक्टर जप्त

हेदेखील वाचा

जेव्हा तिच्या सायकलीला अचानक बिबट्या क्रॉस करतो…

Leave A Reply

Your email address will not be published.