वणीत डिजिटल मीडियातील पत्रकारांची संघटना स्थापन

'व्हॉइस ऑफ डिजिटल मीडिया' पत्रकार संघटनेची कार्यकारिणी जाहीर, अध्यक्षपदी राजू निमसटकर तर उपाध्यक्ष राजू तुराणकर व सचिवपदी अजय कंडेवार

बहुगुणी डेस्क, वणी: ‘व्हॉइस ऑफ डिजिटल मिडिया’ या पत्रकार संघटनेची कार्यकारिणी बुधवारी दिनांक 11 जानेवारी रोजी जाहीर करण्यात आली. यात सर्वानुमते अध्यक्षपदी राजू निमसटकर, उपाध्यक्षपदी राजू तुराणकर, सचिव अजय कंडेवार, सहसचिव प्रशांत चंदनखेडे, कोषाध्यक्ष रमेश तांबे यांची निवड करण्यात आली. शासकीय रेस्ट हाऊस येथे पार पडलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

डिजिटल मीडियाला पत्रकारितेतील भविष्य मानले गेले आहे. गेल्या काही वर्षात वाढत चाललेला डिजिटल मीडियाचा प्रभाव आणि डिजिटल मीडियात कार्यरत पत्रकारांना येणा-या समस्या तसेच या नवीन व आधुनिक मीडियाचा प्रसार आणि प्रचार इत्यादी गोष्टी लक्षात घेऊन वणीउपविभागातील डिजिटल मीडियात कार्यरत असलेल्या पत्रकारांनी एकत्र येत ‘व्हॉईस ऑफ डिजिटल मीडिया’ ही पत्रकार संघटनेची स्थापना केली. या संघटनेत वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील डिजिटल मीडियात कार्यरत पत्रकारांचा समावेश आहे.

याबाबत बुधवारी दुपारी वणीतील शासकीय विश्रामगृहात बैठक घेण्यात आली. यात सर्वानुमते संघटनेची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. बैठकीत राजू निमसटकर-अध्यक्ष, राजू तुराणकर- उपाध्यक्ष, अजय कंडेवार- सचिव, प्रशांत चंदनखेडे- सहसचिव, रमेश तांबे-कोषाध्यक्ष, संतोष पेंदोर-संघटक, तर कायदेशीर सल्लागार म्हणून ऍड. दिलीप परचाके यांची निवड करण्यात आली. तर निकेश जिलठे, सुनील इंदूवामन ठाकरे, देव येवले, प्रशांत जुमनाके, संतोष बहादूरे, आनंद नक्षणे हे संघटनेचे सदस्य म्हणून राहणार आहे.

डिजिटल मीडियातील पत्रकार राहणार संघटीत – राजू निमसटकर
डिजिटल मीडिया हे नवे माध्यम असल्याने देशात अनेक ज्येष्ठ पत्रकार, संपादक या क्षेत्राकडे वळत आहे. आपल्या परिसरातही याचा चांगला प्रसार झाला आहे. मात्र या माध्यमातील पत्रकार एद्यापही संघटीत नाही. ही बाब लक्षात घेऊन व्हॉईस ऑफ डिजिटल मीडिया ही संघटना स्थापना करण्यात आली. पत्रकारांसाठी त्यांचे संरक्षण, आरोग्य, घर, कुटुंब सुरक्षितता, शिक्षण ही पंचसूत्री घेऊन ही संघटना काम करणार आहे. तरुणाई आणि महिलांनी देखील या क्षेत्रात यावे यासाठी भविष्यात त्यांच्यासाठी विविध शैक्षणिक उपक्रम राबवले जाणार आहे.
– राजू निमसटकर, अध्यक्ष

यावेळी नवनियुक्त पदाधिकारी यांचे संघटनेच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले व पुढील वाटचालीकरिता त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी पत्रकार संघटनेचे सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

Comments are closed.