बोटोणी येथील शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

मारेगाव तालुक्यात शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरूच

भास्कर राऊत, मारेगाव: तालुक्यातील बोटोणी येथील एका शेतकऱ्याने राहत्या घरीच गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव कवडू यादव उर्फ चांदोबा नेहारे (64) असे आहे. ते अल्पभूधारक होते. दुपारी त्यांनी नायलॉनच्या दोरीने घराच्या छताला गळफास घेतला. दुपारी 3 वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. सततच्या नापिकीमुळे ते आर्थिक विवंचनेत होते. गेल्या काही दिवसांपासून ते नैराश्यात जीवन जगत होते. शिवाय त्यांच्यावर काही खासगी सावकाराचे कर्ज असल्याचे बोलले जात आहे. जात आहे. नेमके आत्महत्येचे कारण अस्पष्ट असून सततची नापिकी व आर्थिक विवंचनेतून त्यांनी हे पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले व एक मुलगी असा आप्त परिवार आहे. मिनमिळावू स्वभावाच्या कवडू यादव यांच्या आत्महत्येमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

 

Comments are closed.