ऑटो चालकाला लाकडी दांड्याने मारहाण

आरोपीला वांजरी येथून अटक

जितेंद्र कोठारी, वणी : साई मंदिर चौकात प्रवाश्यांची वाट पाहत असलेल्या ऑटो चालकाला एकाने लाकडी दांड्याने मारहाण केली. मारहाणीत ऑटोचालकाच्या हाताला फ्रॅक्चर झाला. मारहाण केल्याची तक्रार पोलिसांना केल्यास जीवानिशी ठार करण्याची धमकी दिल्याची फिर्याद ऑटोचालक धनु बिसव्वा बघवा (25) रा. वांजरी यांनी केली आहे.

तक्रारीनुसार फिर्यादी बुधवार 18 मे रोजी सायंकाळी 6 वाजता दरम्यान साई मंदिर चौक येथे ऑटो घेऊन प्रवाश्यांची वाट बघत होता. त्यावेळी आरोपी प्रफुल बंडू पाटील, (35) रा. वांजरी ता. वणी हातात लाकडी दांडा घेऊन आला व ऑटोचालक धनु बिसव्वाला शिवीगाळ करुन खाली पाडून दांड्याने मारहाण केली. जखमी ऑटोचालकाला नागरिकांनी उचलून ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र हाताला फ्रॅक्चर असल्यामुळे त्याला रेफर करण्यात आले.

Podar School

जखमी ऑटोचालकाने वणी येथील एका खाजगी दवाखान्यात उपचार करुन रात्री 11.30 वाजता वणी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपी विरुद्द कलम 326, 504, 506 नुसार गुन्हा दाखल करून रात्री 1 वाजता आरोपी प्रफुल पाटील यास वांजरी गावातून अटक केली. पुढील तपास जमादार विठ्ठल बुरेवार करीत आहे.

Sunrise
Comments
Loading...
error: कॉपी करू नका, बातमी आवडल्यास शेअर करा !!