टिळक चौकात तरुणावर फायटरने हल्ला व मारहाण

चार तरुणांवर गुन्हा दाखल

0

विवेक तोटेवार, वणी: शहरातील टिळक चौक परिसरात शनिवार 23 जानेवारी रोजी सायंकाळी 9.30 वाजताच्या सुमारास एका तरुणावर 4 जणांनी हल्ला केला. या हल्यात अनिमेश दीपक गढवाल जखमी झाला आहे. त्याच्या फिर्यादीवरून हल्ला करणाऱ्या चार जणांवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहेे.

सविस्तर वृत्त असे की, दिनांक 21 जानेवारीला अनिमेश हा टिळक चौकात आपल्या काही मित्रांसोबत गप्पा करीत होता. त्यावेळी अनुर्वेश उर्फ चिकू अनिल सातपुते याच्यासोबत काही कारणावरून वाद झाला. प्रकरण पोलीस ठाण्यात गेले. परंतु पोलिसांनी आपसी सामंजस्यातून वाद मिटवला.

त्यानंतर लगेच दोन दिवसांनीच शनिवार 23 जानेवारी सायंकाळी 9.30 वाजताच्या सुमारास अनिमेश हा आपल्या मित्रांसोबत टिळक चौकात गप्पा करीत होता. त्याचवेळी तेथे आरोपी अनुर्वेश उर्फ चिकू अनिल सातपुते (21) रा. छोरीया लेआऊट, अभिषेक विनोद ताराचंद (21) रा. रंगारीपुरा, रितीक नरेश चवरे (20)  रा. सेवानगर व ललित सुभाष परचाके (21) रा. रंगारीपुरा तिथे पोहचले सुरवातीला त्यांनी अनिमेशला दुचाकीवर बसवून नेण्याचा प्रयत्न केला.

अनिमेशन विरोध करताच त्याला त्याच ठिकाणी फायटर व लथाबुक्क्यांनी मारहाण केली. अनिमेशच्या मित्रांनी त्याला घरी आणले. अनिमेश हा त्याच्या आईवडिलांना घेऊन पोलिसात आला व त्याने तक्रार दिली. तक्रारीवरून आरोपीविरुद्ध कलम 324, 504, 506, 34 नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास जगदीश बोरणारे करीत आहे.

हे देखील वाचा:

आझाद इलेक्ट्राॅनिक्सचा एसी बीग ब्लास्ट सेल AC Big Blast Sale

झरी तालुक्यात राष्ट्रवादी युवती काँग्रेस कार्यकारिणी गठित

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments
Loading...
error: बातमी आवडल्यास शेअर करा !!