गाव पुढाऱ्याच्या त्रासाला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न  

मुकुटबन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

0

देव येवले, मुकुटबन: झरी तालुक्‍यातील अडेगाव येथील अशोक महादेव येवले(45) यांनी दि . 28/9 ला सकाळी 10 वाजताच्या सुमारास आत्महत्येचा प्रयत्न केला. गेल्या सहा दिवसापासून त्यांचेवर वणी येथील सुगम हॉस्पिटल येथे अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहे. आत्महत्येप्रकरणी मारोती नामदेव गोंडे, गोविंदा पीसाराम उरकुडेसह आठ जणांवर आत्महत्येचा प्रयत्न करण्यास प्रवृत्त केल्याची तक्रार मुकुटबन पो.स्टे.ला करण्यात आली आहे.

प्राप्त झालेल्या माहितीनुसार, अशोक येवले यांचे वडिलोपार्जित घर हे रस्त्या लगत आहे. यातून पुर्ववैमनस्यातून “तुझे घर अतिक्रमणात आहे. तुझे घर पाडून तुला बेघर करतो” अश्या धमक्या सातत्याने मिळत होत्या. धमक्यांमुळे गेल्या चार महिन्यापासून मानसिक त्रास देणे सुरू होते. असा आरोप अशोक यांनी करत या बाबत गटविकास अधिकारी, तहसीलदार, जिल्हाधिकारी यांना निवेदनही दिले होते. मात्र गेल्या काही दिवसात मानसिक त्रास देण्याचे प्रकार इतके वाढले होते की, त्याला कंटाळून अशोक येवले यांनी गुरुवारी दि . 28 ला सकाळी चिट्ठी लिहून स्वत:च्या शेतात जाऊन विषारी द्रव प्राशन करुन आत्महत्याकरण्याचा प्रयत्न केला.

त्यावरुन आत्महत्येस प्रवृत्त करणे मारोती नामदेव गोंडे , प्रशांत मारोती गोंडे , मारोती नागो गोंडे , प्रणाल मारोती गोंडे , छत्रपती बोधे, गोविंदा उरकुडे , संजय काटकर , आनंद वनकर वामन वनकर , श्रीराम राऊत यांच्याविरुद्ध अशोक येवले यांची पत्नी प्रविणा अशोक येवले यांनी मुकुटबन ठाण्यात लेखी तक्रार दिली. आता पोलीस प्रशासन यांचेवर काय कार्यवाही करते या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.