समाजसेवी आजोबा-आजीचा स्मृतीदिन नातवाने केला सामाजिक उपक्रमाने साजरा

शहरात सर्वत्र नातू आकाशचे कौतुक

0

ज्योतिबा पोटे,  मारेगाव: नातू व आजी आजोबाचे नाते जगावेगळेच असते. हृदयात कोरलेले त्यांच्या आठवणी उभ्या आयुष्यात मनाला  समृद्ध करतात मग आयुष्य कस सुकर होत जाते. याची प्रचिती मारेगावात आली.

आकाशच्या आजोबांनी आपले आयुष्य समाज सेवेसाठी खर्च घातले. त्यांच्याच पावालावर पाऊल टाकत आकाशही त्यांचा वारसा जपत आहे. आजोबा नानाजी बदकी व आजी अंजनाबाई यांचा स्मृती दिन विविध सामाजिक उपक्रम राबवून मारेगावात साजरा करण्यात आला.

आजोबा नानाजी भिवाजी बदकी हे मारेगावचे पाहिले सरपंच नानाजी बदकी हे त्याकाळचे समाजसेवी  त्यांच्या पत्नी अंजनाबाई यांच्या सुद्धा नानाजी सोबत समाजसेवेत खांद्याला खांदा लावून उभ्या राहायच्या. अंजनाबाई यांनी मरेगावत पाहिले महिला मंडळ स्थापन केले आणि त्या महिला मंडळाच्या चाळीस वर्ष अध्यक्ष होत्या. याच माध्यमातून त्यांनी समाज सेवा सुरु केली. त्यांनी महिलांच्या अनेक समस्या सोडविल्या धर्मिक, सामाजिक अनेक उपक्रम राबविले. शारदा उस्तव मंडळाची स्थापना करुण मारेगावात प्रथमच तान्हा पोळ्याचे आयोजन केले असे अनेक उपक्रम राबविले. मात्र  27 सप्टेम्बर 2012 ला त्यांनी प्राण त्यागला. त्यानंतर काही वर्षात पति नानाजी बदकि यांनी सुद्धा प्राण त्यागले.

त्यांच्या उणीवा कधीच भरून निघनाऱ्या नाहीत पण त्यांच्या चांगल्या कार्याच्या आठवणी मारेगावत आजही ताज्या आहेत. आकाशचे आजोबा हयात असताना आवर्जून सांगायचे माझा नातू नक्कीच माझे सारखे सामाजिक कार्य  करेल आणि त्यांच्या शब्दांचा मान राखताना आता आकाश दिसत आहे. आज त्यांच्याच वारसा घेऊन नातू आकाश युवराज बदकी यानी समाज सवेला सुरुवात केली आहे.

त्यांच्या कार्याचे मारेगावात भरभरून कौतुक केल्या जात आहे आज आजी अंजनाबाई व आजोबा नानाजी बदकी यांच्या स्मृतिदिनी मारेगाव ग्रामीण रुग्णालयात फळे वाटून व स्वच्छ्तेचा कार्यक्रम घेऊन  स्मृतिदिन साजरा केला. यावळेस आकाशचे मित्र परिवारातील अनेकांनी या सामाजिक उपक्रमांला भरभरुन  पाठिंबा दिला, त्यात विशाल कीन्हेकर नागेश रायपूरे अजय धेडान्दे,विवेक बोबडे विशाल परचाके,नंदू आसुटकर प्रवीण काळे ,नविन बामने ,शिवम  रायपुरे ,भूषण कोल्हे,संदीप नागोशे प्रशांत खंगार, प्रदीप पवार, प्रमोद कीन्हेकार ,रोहित पवार ,नरेश राजुरकर आदि उपस्थित होते. या सामाजिक उपक्रमाने नातु आकाश याचे सर्व स्तरातून आजी आजोबा प्रती असलेली सामाजिक बांधिलकी जोपासल्याने विशेष कौतुक होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.