ऑटो चालक व मालक यांचा वाहतूक संदर्भात क्लास

अधिका-यांनी ऑटो चालकांना केल्यात सूचना

विवेक तोटेवार, वणी: 13 सप्टेंबर रोजी वणीतील वाहतूक उपशाखेत परिसरातील ऑटो चालक, मालक यांची सभा पार पडली. उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश किंन्द्रे यांच्या अध्यक्षतेखाली संध्याकाळी 5 वाजताच्या सुमारास ही सभा आयोजित करण्यात आली होती. सदर सभेला पोलिस निरीक्षक अनिल बहेरानी पोलीस स्टेशन वणी, तेजस हगवने प्रशासकीय अधिकारी न.प. वणी, सपोनि आपसुंदे पो.स्टे‌. वणी यांनी सभेला उपस्थीत राहुन परीसरातील उपस्थित ऑटो चालक, मालक यांना वणी शहरातील वाहतूक समस्या व ऑटो चालकांच्या तक्रारी पाहता काही सूचना करण्यात आल्या.

कोणताही ऑटो चालक वणीतील अत्यंत रहदारी व मार्केट परिसरात गांधी चौकात अँटो घेऊन जाणार नाही, सर्वांकडे ऑटो चालविण्याचा परवाना असणे गरजेचे आहे, वाहनाचे कागदपत्रे अद्यावत करावी, चालकाचे बाजुला महिला बसवु नये, टिळक चौकात शिस्तीत वाहने लावावी. दारु पिवून कोणी ऑटो चालवनार नाही, ऑटोमध्ये जोरजोरात गाणी वाजवु नये, ऑटोच्या उजव्या बाजुना लोखंडी ग्रील किंवा रॉड लावणे, क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसवू नये,

वाहतूक नियमांचे पालन करावे, इत्यादी सूचना देऊन शहरातील पार्किंग व्यवस्था, ऑटो करिता ऑटोस्टॅंड उपलब्ध करून देणे, इत्यादी बाबतीत प्रशासकीय अधिकारी नगर परिषद वणी यांनी आश्वासन दिले. तसेच एखादी अपरिचीत घटना घडत असल्यास पोलीस स्टेशने फोनवर किंवा 112 वर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले. सदर सभेला शेकडो चालक-मालक उपस्थित होते.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.