ऑटो चालकाचा प्रामाणिकपणा, दागिने व रक्कम असलेले पर्स केले परत

ठाणेदारांनी केला ऑटोचालकाचा सत्कार तर प्रवाश्यांनी दिले पाचशे रुपये बक्षीस

जितेंद्र कोठारी, वणी : वणीतील एक ऑटोरिक्षा चालकाने प्रवाशाने ऑटोमध्ये विसरलेले रोख रक्कम व दागिने असलेले पर्स पोलिसांच्या मदतीने प्रवाशाला परत करून प्रामाणिकपणेचा परिचय दिला आहे. अफसर खान हकीम खान रा. राजुर ता.वणी असे या इमानदार ऑटो चालकाचा नाव आहे. ऑटो चालकाने  दाखवलेल्या प्रामाणिकपणाबद्दल पोलीस निरीक्षक अजित जाधव व स्टाफने त्याचे गुलाब पुष्प देऊन कौतुक केले. तसेच ज्या प्रवाश्याची पर्स होती त्यांनी ऑटो चालकाच्या प्रामाणिकतेवर खुश होऊन बक्षीस दिले.

प्राप्त माहितीनुसार राजूर येथील अफसर खान हकीम खान हे वणी ते राजूर तीनचाकी ऑटो चालवितात. बुधवार 18 ऑक्टो. रोजी सकाळी 10 वाजता ऑटो रिक्षा चालक अफसर खान वणी पोलीस स्टेशनला आले. त्यांनी दि. 17 ऑक्टो. रोजी त्याच्या ऑटो मध्ये प्रवास करणाऱ्या कोणत्यातरी प्रवाशाची पर्स चुकून राहिलेली आहे. तो प्रवासी कोण आहे याबद्दल मला काही माहीत नसून सदरची पर्स त्या प्रवाशाला परत करण्यास पोलिसांनी सहकार्य करावे अशी विनंती केली.

ऑटो चालक अफसर खान यांचे सत्कार करताना ठाणेदार अजित जाधव

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

दरम्यान सौ. दुर्गा जितेंद्र पोयाम ह्या तक्रारकर्त्यांनी त्यांची पर्स 17 तारीख रोजी कुठेतरी हरवली आहे अशी तक्रार दिली. ठाणेदार अजित जाधव यांनी त्यांना पर्समध्ये काय किमती वस्तू होत्या याबद्दल विचारणा केली व पर्सचे वर्णन विचारले. त्यांनी पर्स मध्ये 3 हजार 500 रुपये रोख तसेच चांदीचे पैजण व काही दागिने असल्याचे सांगितले. त्यांनी सांगितले वर्णन व रिक्षा चालक अफसर खान यांनी आणून दिलेली पर्स ही एकच असल्याची खात्री झाल्याने रिक्षा चालक अफसर खान यास बोलावून त्याच्या हस्ते महिला दुर्गा जितेंद्र पोयाम यांना त्यांची ऑटो रिक्षामध्ये राहिलेली पर्स त्यामधील रोख रक्कम व चांदीच्या दागिन्यासह परत केली केली.

रिक्षा चालक अफसर खान यांनी दाखवलेल्या प्रामाणिकपणाबद्दल पोलीस निरीक्षक अजित जाधव व स्टाफने त्याचे गुलाब पुष्प देऊन कौतुक केले. तसेच जितेंद्र पोयाम यांनी अफसर खान याच्या प्रामाणिकपणाबद्दल त्याला पाचशे रुपये बक्षीस दिले.

Comments are closed.