अवैध देशी दारू वाहतूक प्रकरणी एकास अटक; 3.43 लाखांचा मुद्देमाल जप्त

स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळ यांची धडक कारवाई

 विवेक तोटेवार , वणी पोलीस स्टेशन वणी हद्दीत अवैधरित्या देशी दारूची वाहतूक करून विक्री करणाऱ्या इसमास ताब्यात घेऊन स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळ यांनी यशस्वी कारवाई केली आहे. या कारवाईत देशी दारू व वाहनासह एकूण 3,43,840 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

दिनांक 09 डिसेंबर 2025 रोजी स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळ हे पोलीस स्टेशन वणी परिसरात घरफोडी व चोरीच्या गुन्हेगारांचे चेकिंग तसेच अवैध धंद्यांवर कारवाईसाठी पेट्रोलिंग करीत असताना खास खबऱ्याकडून गोपनीय माहिती मिळाली. नांदेपेरा रोडने पांढऱ्या रंगाची मारुती सुझुकी कार (क्र. MH 31 BC 1777) मधून अवैध देशी दारूची वाहतूक होणार असल्याची माहिती प्राप्त झाली.

माहितीची खात्री करून पोलिस पथकाने तत्काळ सापळा रचत सदर वाहन थांबविले. वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये अवैध देशी दारू आढळून आली. वाहनचालकास ताब्यात घेऊन त्याचे नाव मोहम्मद इरफान मोहम्मद सिद्दीकी (वय 37 वर्षे, रा. भीमनगर, वणी) असे निष्पन्न झाले.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

तपासादरम्यान आरोपीकडून 90 ML व 180 ML क्षमतेच्या देशी दारूच्या एकूण 1048 शिश्या (किंमत सुमारे 43,840 रुपये) व दारू वाहतुकीसाठी वापरलेले वाहन असा एकूण 3,43,840 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.  

सदर आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा नोंदवून पुढील कायदेशीर कारवाईसाठी त्यास पोलीस स्टेशन वणी यांच्या ताब्यात देण्यात आले असून पुढील तपास पोलीस स्टेशनचे पोहवा अविनाश चिकराम करीत आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिता, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात (यवतमाळ) यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि. सतीश चव्हरे, सपोनि. दत्ता पेंडकर तसेच पोहवा सुनील खंडागळे, सुधीर पांडे, निलेश निमकर, सुधीर पिदुरकर, पोका सलमान शेख, रजनीकांत मडावी, चापोना सतीश फुके आदी स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

Comments are closed.