डीजेमुक्त गणपती विसर्जन करा: लगारे

मुकुटबन पोलीस स्टेशनमध्ये शांतता कमिटीची बैठक

0

सुशील ओझा, झरी: आगामी गणेशोत्सव पोलीस व डीजेमुक्त करण्याचे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी विजय लगारे यांनी केले. मुकुटबन पोलीस स्टेशनमध्ये आयोजित शांतता कमिटीच्या बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी त्यांनी हे आवाहन केले.

सभेचे अध्यक्ष एसडीपीओ विजय लगारे होते. प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच शंकर लाकडे, ठाणेदार धनंजय जगदाळे, पोलीस उपनिरीक्षक नितीन चुलपार,भुमारेड्डी बाजनलावार, सुशील ओझा, सुरेश मानकर, सचिन उपरे, मज्जीद शेख, श्याम बोदकुरवार, गज्जलवार आदी उपस्थित होते. प्रास्तविक ठाणेदारांनी केले.

गणपतीची विटंबना होऊ नये, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, मंडपात जुगार खेळू नये, गावातील मिरवणूक शांततेत पार पाडावी, याकरिता सर्वधर्म समभाव सारखे मानून मोहरम सण देखील उत्साहात पार पाडण्याचे आवाहन केले.

सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार ५० ते ५५ डेसीबल च्यावर आवाज वाढल्यास मंडळाच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हे नोंद होते, त्यामुळे सर्व गणेश मंडळांनी ५० हजार रुपयांचा बँड, डीजे लावण्यापेक्षा परिसरातील शिक्षित विद्यार्थ्यांना नोकरीकरिता लागणाऱ्या ज्ञानाची कार्यशाळा घेण्याचे आवाहन केले. .

मंडळांनी सर्वप्रथम ऑनलाइन परवानगी घ्यावी, अनुचित प्रकार घडू नये याकरिता पोलीस पाटील यांनी गावातील संपूर्ण माहिती ठेऊन पोलिसांना कळविणे, पोलिसांनी दिलेल्या मार्गांने गणेश विसर्जन करणे याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

मुकुटबन पोलीस स्टेशनंतर्गत ६१ गावे येत असून ३२ गणपती ग्रामीण भागात बसतात, तर ७ गणपती मुकुटबनला बसणार आहे. मुकुटबन येथे विसर्जनासाठी सरपंच शंकर लाकडे तलावाजवळ लाईटची व्यवस्था करणार आहे. यावेळी नीरज पातूरकर, प्रदीप कवरासे, सुलभ उईके, अशोक नैताम, मारोती टोंगे, स्वप्निल बेलखेडे, सागर मेश्राम, राम गदडे, रमेश मस्के आदी परिश्रम घेतले.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.