विलास ताजने, वणी: शिरपूर पोलीस ठाण्या अंतर्गत येणाऱ्या पुरड (पुनवट) येथे कुऱ्हाडीने हल्ला करून एकाला जखमी केल्याची घटना रविवारी सायंकाळी पाच वाजता घडली. सचिन दिलीप कोंगरे (३४) असे जखमी तरुणाचे नाव आहे. केवळ शंभर रुपयासाठी सदर हल्ला झाल्याचे समजते. सदर घटनेची फिर्याद सचिन कोंगरेनी शिरपूर पोलिसात दिली.
आरोपी शंकर नथु कोल्हेकर (५९) यानी सचिनकडे असलेले शंभर रुपये मागितले. रस्त्यात पैसे मागितल्याच्या कारणावरून सचिनला राग आला. थोड्या वेळाने सचिन शंकरच्या घरी गेला. यावेळी दोघात वाद झाला. सचिनने शंकरला मारहाण करण्यास सुरुवात करताच आरोपी शंकरने जवळच असलेल्या कुऱ्हाडीने सचिन वर हल्ला चढवला. यात सचिनच्या डोक्यावर वार झाला.
जखमी सचिनला चंद्रपूर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. आरोपी शंकर कोल्हेकर याला पोलिसांनी अटक करून ३२४,५०४,५०६ भादंवी नुसार गुन्हा दाखल केला. आरोपीला न्यायालयात हजर केले. न्यायालयाने आरोपीला जामीन मंजूर केला. पुढील तपास शिरपूर पोलीस करीत आहे.